
रत्नागिरीमधील मंडणगडजवळ एका एसटी बसचा अपघात झाला आहे. एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा दुर्घटना घडला असती. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.