Sindhudurg Sea Drowning : धक्कादायक! वेळागर समुद्रात नऊजण बुडाले, मोठी लाट आली अन् सर्वच खेचले गेले; मुलासह तिघांचे मृतदेह हाती, शोध मोहीम सुरू

Velagar Beach Accident : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर (शिरोडा) येथे पर्यटनासाठी गेलेल्या नऊजणांना सायंकाळी समुद्रात उधाण आलेल्या लाटेने वाहून नेले.
Sindhudurg Sea Drowning

वेळागर समुद्रात नऊजण बुडाले

esakal

Updated on
Summary

हायलाइट्स (Highlight Summary - 3 Points)

वेळागर समुद्रकिनाऱ्यावर भीषण दुर्घटना:

वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर (शिरोडा) येथे पर्यटनासाठी गेलेल्या नऊजणांना सायंकाळी समुद्रात उधाण आलेल्या लाटेने वाहून नेले; त्यापैकी तीघांचे मृतदेह सापडले, चारजण अद्याप बेपत्ता, तर दोघांना वाचवण्यात यश आले.

कित्तूर आणि मणियार कुटुंबांवर दुर्दैवी आघात:

मृत आणि बेपत्ता झालेल्यांमध्ये बेळगावमधील कित्तूर कुटुंबातील सहा व कुडाळ पिंगुळीतील मणियार कुटुंबातील दोन सदस्यांचा समावेश आहे. एका महिन्यानंतर होणारा विवाह या दुर्घटनेमुळे काळाच्या पडद्याआड गेला.

प्रशासन आणि स्थानिकांचा बचाव प्रयत्न:

स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि प्रशासनाच्या मदतीने सुमारे साडेतीन तास शोधमोहीम राबवण्यात आली. उशिर झाल्याने मोहीम थांबवली असून ती उद्या पुन्हा सुरू होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Vengurla Shiroda Beaches : वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर (शिरोडा) येथे पर्यटनासाठी गेलेले नऊजण आज सायंकाळी समुद्रात बुडाले. यातील दोघांना वाचवण्यात यश आले. तिघांचे मृतदेह सापडले असून चारजण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये पिंगुळी (ता. कुडाळ) मधील मणियार कुटुंबातील दोघे, तर बेळगावमधील कित्तूर कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. ही घटना सायंकाळी पावणेपाचला घडली.

मृतांमध्ये फरीन इरफान कित्तूर (वय ३४), इबाद इरफान कित्तूर (१३, रा. सर्व लोंढा, ता. खानापूर, जि. बेळगाव), नमीरा आफताब अत्तार (१६ रा. अळणावर, जि. कारवार) यांचा समावेश आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (३६), इकवान इमरान कित्तूर (१५, दोन्ही रा. लोंढा ता. खानापूर, जि. बेळगाव), फरहान महम्मद मणियार (२५), जाकीर निसार मणियार (१३, दोघे रा. पिंगुळी गुढीपूर, कुडाळ) यांचा समावेश आहे. शिवाय इमरान अहमद मोहम्मद इसाक कित्तूर आणि इसरा इम्रान कित्तूर (१७, लोंढा, बेळगाव) या दुर्घटनेतून बचावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com