शॉर्टसर्किटने आग भडकून घर जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

कणकवली - शिवडाव-ओटसवाडी येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत घर जळाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. काल (ता. 29) रात्री घडलेल्या या घटनेत गरीब, निराधार महिलेचा संसार उघड्यावर आला आहे. ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्‍यात आणली; मात्र कष्टाने राखून ठेवलेले धान्य, कपडेलत्ते, सोने आणि रोख रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी गेली.
 
शिवडाव येथील शुभांगी प्रभाकर सावंत यांच्या मालकीचे हे घर असले, तरी त्यांची नणंद पुष्पा परशुराम सावंत-पणदूरकर या त्या घरात एकट्याच राहत होत्या. मोलमजुरी करून त्या आपला उदरनिर्वाह करत असे; मात्र काल रात्री दहा वाजता एका धार्मिक कार्यक्रमासाठी घर बंद करून त्या वाडीत गेल्या होत्या. या वेळी घराला अचानक आग लागली. यात सुमारे तीस हजारांचे सोन्याचे दागिने, रोख दहा हजार रुपये, सर्व कपडे, तांदळासह कडधान्य आणि घरातील इतर सामान जळाले. पाऊस कमी प्रमाणात होता, तरी घरातील आतील सामानाने पेट घेतला. काही वेळात संपूर्ण घराने पेट घेतला. त्यामुळे घराचे पत्र्यांचे छप्परही जळाले. बऱ्याच वेळेनंतर शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर आग विझविण्यात आली. वाडीतील धार्मिक कार्यक्रमाला जमलेल्यांनी आग विझवली; मात्र या घटनेबाबत तालुक्‍यातील आपत्ती निवारण कक्षाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. सावंत यांचे शासनाच्या इंदिरा आवास योजनेतून हे घर बांधण्यात आले होते. तेथे पुष्पा एकट्याच राहतात; मात्र आगीत त्यांच्या घराचे नुकसान झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. तलाटी, पोलिसपाटील यांनी पंचनामा केला.

Web Title: Short Circuit fire consumed the house

टॅग्स