short film ZunjuMunju 16 different awards 9 national and international festivals
short film ZunjuMunju 16 different awards 9 national and international festivalssakal

‘झुंजुमुंजु’ची १६ पुरस्कारांवर मोहर

सर्वोत्कृष्ट लघुपटासह अनेक पुरस्कार; मंडणगडमधील तरुणांची निर्मिती

मंडणगड : अंधश्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास, चुकीच्या पायावर उभी असणारी विचारसरणी. मानवाने समुद्राचा तळ शोधून काढला असून, आकाशाला गवसणीही घातली आहे. तरीही तो आजही ग्रहमान, साडेसाती यात अडकून पडला असून, शिक्षणाच्या माध्यमातून त्यावर ज्ञानाचा प्रकाश टाकणाऱ्या मंडणगडच्या झुंजुमुंजु या लघुपटाने आतापर्यंत नऊ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये १६ विविध पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे. पुरस्काराची वाटचाल सुरूच असून, आणखी सात फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याची निवड झाली आहे.

फस्ट स्टेप, राजष्मी, भारत, पुणे, केरला, शिमला या फेस्टिव्हल नंतर नुकत्याच जाहीर झालेल्या वेंटेज रील्स फिल्म फेस्टिवल २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म, सर्वोत्कृष्ट सामाजिक फिल्म, ज्युरी अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट थॉटफूल फिल्म. तामिळ इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म, सर्वोत्कृष्ट फिल्म मेकिंग, प्रोडक्शन डिझाइन. तसेच बायस्कोप सिनेफिल्म फेस्टिवल २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट यूथ फिल्ममेकर, कॉन्सेप्ट असे पुरस्कार मिळविले आहेत. तसेच गोल्डन लायन, गोवा, इंडियन, द सिनेमा, मुंबई, रिल्स, फस्ट अशा सात अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये त्याची अधिकृत निवड झाली आहे. धर्मी फिल्म प्रोडक्शन व पंचरत्न प्रोडक्शन प्रस्तुत या लघुपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन गणेश सीताराम माळी यांचे असून, यात मुख्य कलाकार रितेश हंबिर, सुभद्रा फुंदे, नरेश गोरे, शांताराम पवार, संभाजी वाफेलकर, धोंडीबा झोरे यांनी अभिनय केला आहे. कॅमेरामन, एडिटिंग अभिषेक पाडेकर तसेच निर्मिती सुशील मोरे, विकास जाधव यांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com