esakal | पुरावा दाखवा आणि मगच बोला
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षा ठाकुर

"पुरावा दाखवा आणि मगच बोला"

sakal_logo
By
संतोष कुलकर्णी

देवगड : भाजपमधून आपल्याला यापुर्वी बडतर्फ केले असल्याचे भाजपचे देवगड जामसंडे शहराध्यक्ष योगेश पाटकर यांनी पुराव्यानिशी दाखवून द्यावे आणि मगच बोलावे, असे आव्हान नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेविका हर्षा ठाकूर यांनी दिले आहे.

हेही वाचा: प्युरीफायर घोटाळाच्या चौकशीसाठी नवे अधिकारी

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेविका हर्षा ठाकूर तसेच नगरसेवक विकास कोयंडे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने पक्ष प्रवेशाचे नाट्य म्हणजे शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा केलेला अपमान असल्याचे भाजपचे देवगड जामसंडे शहराध्यक्ष योगेश पाटकर यांनी म्हटले होते. त्याला ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा: अखेर चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरलाच;पाहा व्हिडिओ

येथील शिवसेना कार्यालयात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी नगरसेवक विकास कोयंडे, उपतालुकाप्रमुख बुवा तारी, दादा पडेलकर, निनाद देशपांडे उपस्थित होते. ठाकूर म्हणाल्या, "ज्यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे त्यांचे प्रवेश करून घेणे हा मुख्यमंत्री ठाकरे यांचा अपमान असल्याचे श्री. पाटकर म्हणत असतील तर कुठल्या पक्षातून नेमकी कुणी, केव्हा आणि कोणाची हकालपट्टी केली हे पुराव्यानिशी श्री. पाटकर यांनी दाखवून द्यावे. भाजपमधून आपली हकालपट्टी केल्याचे आपणाला पत्र पाठवलेले नाही. आपणाला पत्र मिळाल्याचा माझ्या सहीचा काही पुरावा असल्यास त्यांनी दाखवावे. उगाच सोशलमिडियावर पत्र टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये" असे हर्षा ठाकूर यांनी म्हटले आहे.

loading image
go to top