भर पावसात अनुपमदादा मित्रमंडळाकडून पालीतील खड्डे बुजविले

भर पावसात अनुपमदादा मित्रमंडळाकडून पालीतील खड्डे बुजविले

पाली - अष्टविनायकापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अनुपमदादा मित्र मंडळाच्या सदस्यांनी संघटित होऊन बुधवारी (ता.१८) भर पावसात हे खड्डे बुजविले.

हे खड्डे भरण्यासाठी खडी, ग्रीट व सिमेंटचा वापर करण्यात आला. त्यामूळे आता खड्डे योग्य प्रकारे भरले गेले आहेत. सध्या पालीतील ग्रामपंचायतीचा कारभार मुदत संपल्यामूळे संपुष्टात आला आहे. अजुनही प्रशासकाची नेमणूक झालेली नाही. त्यामूळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीच वाली उरलेला नाही. खड्यांमुळे तर पालीतील नागरीक अाणि येणारे भाविक देखिल वैतागले आहेत. त्यामूळे अनुपमदादा मित्रमंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेवून खड्डे बुजविण्यासाठी श्रमदान केले व पालीतील खड्डे बुजविले आहेत. सामाजिक कामांबरोबरच पालीतील विविध समस्या सोडविण्यासाठी अनुपमदादा मित्र मंडळाकडून अावश्यक ते सर्व सहाय्य व कामे केली जातील असे अनुपम कुलकर्णी यांनी सकाळला सांगितले. यावेळी अनुपमदादा मित्र मंडळाचे अध्यक्ष संदेश सोनकर, उपाध्यक्ष भाऊ मोहिते, सचिव वैभव जोशी यांच्यासह अधिलेश कुलकर्णी, मिलिंद थळे, राकेश मढवी, निलेश पवार, नरेश मोहिते, उमेश साखरले, अखिल महाडकर आदी सदस्यांनी मिळून श्रमदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com