

Shrivardhan Fishermen Crisis
esakal
श्रीवर्धन : खराब हवामान, सोसाट्याचे वारे आणि समुद्रातील अनियमित वातावरणाचा श्रीवर्धन तालुक्यातील मच्छीमारांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. वल्हावर चालणाऱ्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावरच असल्याने अनेक मच्छीमारांचा मासेमारीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. परिणामी, दररोजच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या मच्छीमार कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
मच्छीमारी व्यवसाय वाढविण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी बँकांकडून कर्ज घेऊन होड्या, जाळी, इंजिन व अन्य आवश्यक साहित्य खरेदी केले आहे; मात्र समुद्रात नियमितपणे जाता येत नसल्याने उत्पन्नाचे साधन कमी प्रमुख मागण्या प्रतिकूल हवामानामुळे व्यवसाय बंद असलेल्या मच्छीमारांना तातडीची आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्या.
बँकांच्या कर्जाच्या हप्त्यांना मुदतवाढ देऊन काही काळासाठी हप्ते स्थगित का? कर्जावरील व्याजात सवलत अथवा व्याज माफीची योजना लागू करा. होड्या, जाळी व मच्छीमारी साहित्याच्या देखभालीसाठी विशेष आर्थिक अनुदान द्या. छोट्या मच्छीमारांसाठी असलेल्या जाचक नियम व अटी शिथिल करा. परवाने व अन्य शासकीय प्रक्रियेत सवलत द्या.
त्यामुळे बँकेचे कर्जाचे हप्ते, होड्यांची देखभाल, जाळ्यांची दुरुस्ती तसेच कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविताना मच्छीमारांची मोठी आर्थिक कसरत होत आहे. सरकारच्या विविध नियम, अटी आणि परवानगी प्रक्रियेचा फटकाही छोट्या मच्छीमार व्यावसायिकांना बसत असल्याची तक्रार आहे. हवामानामुळे आधीच व्यवसायावर परिणाम झालेला असताना नियमांची पूर्तता करण्यासाठी होणारा खर्च व वेळ यामुळे अडचणी वाढत असल्याचे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.
"हवामान खराब असल्यामुळे समुद्रात जाता येत नाही. त्यामुळे आमचा रोजचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. उत्पन्न बंद असताना बँकेचे कर्जाचे हप्ते भरणे कठीण होत आहे. होडीची देखभाल आणि घर खर्चही भागवावा लागतो. शासनाने आमची परिस्थिती लक्षात घेऊन कर्जाच्या हप्त्यांना मुदतवाढ, आर्थिक मदत आणि जाचक नियमांमध्ये आवश्यक सवलत द्यावी."
- हरिदास वाघे, मच्छीमार व्यावसायिक, श्रीवर्धन हवामानामुळे मासेमारी बंद राहिल्यास मच्छीमार कुटुंबांसाठी विशेष साहाय्य योजना राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.