Local people also have millions of employment opportunities in Lockdown
Local people also have millions of employment opportunities in Lockdown

 स्थानिकांना लाॅकडाऊनमध्येही आहेत रोजगाराच्या लाखो संधी पण...

कोल्हापूर : जिल्ह्यातून परप्रांतीय जिल्ह्याबाहेर जात आहेत. सर्व उद्योग, आस्थापनांच्या शिखर संस्थांनी या परप्रांतीयांना थांबवावे, असे निवेदन केले आहे; मात्र ते थांबण्यास तयार नाहीत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उद्योग, व्यवसाय आणि रोजगारासाठी येणाऱ्या सर्वच कामगारांची कुठे नोंद होत नाही. त्यामुळे नेमकी परप्रांतीयांची संख्या किती, हा संशोधनाचा विषय आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तरीही येथील उद्योग आणि मनुष्यबळाचा विचार करता जिल्ह्यात लाखापेक्षा अधिक परप्रांतीयांची संख्या असल्याचा अंदाज आहे. यामध्ये सर्वांत मोठा कामगार वर्ग हा वस्त्रोद्योग व फौंड्री उद्योगात आहे. हे परप्रांतीय परत जात असल्याने जिल्ह्यात उद्योगाला लागणाऱ्या मनुष्यबळाची मोठी गरज लागणार आहे; मात्र त्यासाठी आळस सोडून, कष्टाची तयारी ठेवली तरच रिकाम्या हाताला काम मिळणार आहे.


वस्त्रोद्योगात ३० हजार परप्रांतीय कामगार
महाराष्ट्राचे मॅंचेस्टर अशी ओळख असलेल्या इचलकरंजीत हजारो वस्त्रोद्योग आहेत. या वस्त्रोद्योगात ३० हजार कामगार परप्रांतीय आहेत. आज चेहऱ्यासाठी मास्क किंवा पीपीई कीट, गाद्या, बेडशीट, हॉस्पिटलना विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात कापडाची मागणी आहे; पण मजूरच नसल्याने उद्योजकांना मर्यादा आल्या आहेत. कोरोनामुळे अडकून राहिलेले कामगार आता थांबण्यास तयार नाहीत. रेल्वेसह खासगी वाहने करून हे लोक आपल्या गावी परतू लागले आहेत. त्यामुळे मॅंचेस्टरला मनुष्यबळाची गरज लागणार आहे.

फौंड्री, बांधकाममध्ये यूपी, बिहारी, राजस्थानी
वस्त्रोद्योगानंतर फौंड्री उद्योगात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर आहेत. यातही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह बिहारांची मोठी संख्या आहे. बांधकाम क्षेत्रात अगदी गिलावा करण्यापासून ते फरशीचे काम, रस्ते, पूल बांधकामापर्यंत परप्रांतीयांवर अवलंबून राहावे लागते. सेंट्रिंग करायचे असेल तर बिहारी, मध्य प्रदेश व कोलकता येथील मजुरांना प्राधान्य देण्यात येते.  फरशीचे काम करायचे असेल तर राजस्थानी लोक पुढे आहेत, तर फर्निचरचे काम करण्यात राजस्थानींसह बिहारी, युपी, एमपीचे लोक आघाडीवर आहेत. रस्ते बांधकामात कर्नाटक येथील मजुरांचा हातखंडा आहे. याचबरोबर बहुतांश सेवा उद्योगात परप्रांतीय पाहायला मिळतो.


परप्रांतीय कामगार का?
  मजुरांचा दर स्वस्त
  १२ ते १४ तास कामाची तयारी
  सुटी घेण्याचा, 
     दांड्या मारण्याचा प्रकार कमी
  कामावर हयगय कमी
  कष्टाचे काम करण्याची तयारी
  सण, वार न पाहता काम

स्थानिक कामगार
  अवजड कामास टाळाटाळ
  हे जमत नाही, ते येत नाही असा सूर
  नवीन करण्याची तयारी नाही
  घड्याळाच्या काट्यावर काम
  मजुरीचा दरही जास्त
  वशिला आणि दबावाचा वापर
  जबाबदारी घेण्यास टाळाटाळ

जिल्ह्यातील प्रमुख 
उद्योगांत संधी
  वस्त्रोद्योग           फौंड्री
  बांधकाम        व्यापार (खाद्यपदार्थ)    सुतारकाम       मशिन ऑपरेटर 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आहे. लाखोंच्या संख्येत रोजगार आहे. या रोजगारासाठी स्थानिक लोकांत कौशल्य विकास करण्याचे नियोजन आहे. कंपन्यांशी चर्चा करून त्यांना आवश्‍यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- जमीर करीम, सहायक आयुक्‍त, कौशल्य विकास कार्यक्रम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com