esakal | सिंधुदुर्गात मृत्यूचा तांडव; 237 नवे रूग्ण; 24 तासात 15 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात मृत्यूचा तांडव; 237 नवे रूग्ण; 24 तासात 15 जणांचा मृत्यू
सिंधुदुर्गात मृत्यूचा तांडव; 237 नवे रूग्ण; 24 तासात 15 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस भयावह होत चालला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 15 रूग्णांचे निधन झाले आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक मृत संख्या आहे. नवीन 237 रुग्ण मिळाले आहेत. 110 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रीय रुग्ण संख्या 2 हजार 889 झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या झपाट्याने 11 हजाराजवळ पोचली आहे. 10 हजार 763 रुग्ण झाले आहेत. आज 110 कोरोना मुक्त झाल्याने हा आकडा 7 हजार 619 झाला आहे. तब्बल 15 मृत्यु झाल्याने मृत संख्या 249 झाली आहे. परिणामी 2 हजार 889 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील 644 रुग्ण शासकीय संस्थेत उपचार घेत आहेत. तब्बल 2 हजार 243 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यानी सांगितले.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात सर्वाधिक कणकवली तालुक्‍यात 74 रुग्ण मिळाले आहेत. यामुळे तालुक्‍यातील 2870 एवढी एकूण बाधित संख्या झाली आहे. वैभववाडी तालुक्‍यात 23 रुग्ण मिळाले आहेत. यामुळे तालुक्‍याची एकूण बाधित संख्या 679 झाली आहे. सावंतवाडी तालुक्‍यात 15 रुग्ण मिळाल्याने 1387 झाली आहे. कुडाळ तालुक्‍यात 24 मिळाल्याने 2192 झाली आहे. देवगड तालुक्‍यात 37 मिळाले असून 1066 संख्या झाली आहे. दोडामार्ग तालुक्‍यात 10 रुग्ण मिळाल्याने 567 संख्या झाली आहे. मालवण तालुक्‍यात 39 रुग्ण मिळाल्याने 1090 झाली आहे. वेंगुर्ले तालुक्‍यात 8 रुग्ण मिळाल्याने एकूण संख्या 845 झाली आहे. जिल्ह्याबाहेरिल 7 रुग्ण मिळाल्याने सध्या 67 रुग्ण जिल्ह्याबाहेरील उपचार घेत आहेत.

2889 रूग्ण सक्रिय असून त्यापैकी 176 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील 153 रुग्ण ऑक्‍सीजनवर तर 23 रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहे. आरटीपीसीआर टेस्ट मध्ये 58 हजार 721 नमुने तपासण्यात आले. यातील 7 हजार 548 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 499 नमूने घेण्यात आले. ऍन्टिजन टेस्टमध्ये एकूण 33 हजार 629 नमुने तपासले. पैकी 3 हजार 234 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 282 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 92 हजार 350 नमूने तपासण्यात आले.

सावंतवाडी तालुक्‍यातील नेतर्डे येथील 62 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना उच्चरक्तदाब होता. देवगड तालुक्‍यातील किंजवडे येथील 49 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना उच्चरक्तदाब होता. कणकवली तालुक्‍यातील भिरवंडे येथील 59 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना उच्चरक्तदाब होता. देवगड तालुक्‍यातील कुणकवणे येथील 65 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना उच्चरक्तदाब होता. वेंगुर्ले तालुक्‍यातील होडावडा येथील 52 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना उच्चरक्तदाब होता. मालवण तालुक्‍यातील कांदळगांव येथील 50 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना मधुमेह होता. कणकवली तालुक्‍यातील कलमठ येथील 57 वर्षीय पुरूषाचे निधन झाले आहे. त्यांना मधुमेह होता. देवगड तालुक्‍यातील वळिवंडे येथील 66 वर्षीय महिलेचे निधन झाले आहे. त्यांना उच्चरक्तदाब होता.

वेंगुर्ले येथील 55 वर्षीय महिलेचे निधन झाले असून त्यांना उच्चरक्तदाब व पक्षघात होता. कुडाळ तालुक्‍यातील नेरूर येथील 78 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना मधुमेह होता. कुडाळ येथील 47 वर्षीय पुरुषाचे निधन झाले असून त्यांना उच्चरक्तदाब होता. सावंतवाडी येथील 55 वर्षीय महिलेचे निधन झाले आहे. त्यांना उच्चरक्तदाब होता. देवगड गिर्ये येथील 75 वर्षीय महिलेचे निधन झाले आहे. त्यांना उच्चरक्तदाब होता. कुडाळ नेरूर येथील 65 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना उच्चरक्तदाब होता. मालवण तालुक्‍यातील माळगाव येथील 55 वर्षीय महिलेचे निधन झाले असून त्यांना मधुमेह होता.

तालुकानिहाय सक्रीय रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे :

देवगड 425 (22), दोडामार्ग 171 (6), कणकवली 550 (60), कुडाळ 461 (43), मालवण 334 (28), सावंतवाडी 322 (50), वैभववाडी 401 (23), वेंगुर्ले 191 (16) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 34 (1).

646 बेड शिल्लक, पण 2243 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

जिल्ह्यात 10 कोविड केअर सेंटर आहेत. यामध्ये 852 बेड उपलब्ध आहेत. त्यातील 251 बेडवर रुग्ण आहेत. 601 बेड शिल्लक आहेत. 11 कोविड हेल्थ सेंटर असून येथे 173 बेड आहेत. यातील 41 बेडवर रुग्ण असून 132 बेड रिक्त आहेत. 7 डीसीएच असून येथे 428 बेड आहेत. 354 बेडवर रुग्ण आहेत. 74 शिल्लक आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 1453 बेड व्यवस्था आहे. यातील 646 बेडवर रुग्ण आहेत. 807 रुग्ण शिल्लक आहेत. जिल्ह्यात एकूण 2 हजार 889 रुग्ण आहेत. यातील 646 रुग्ण शासकीय संस्थेत बेडवर उपचार घेत आहेत. तब्बल 2243 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात 807 बेड शिल्लक असताना होम आयसोलेशन संख्या जास्त आहे.

Edited By- Archana Banage