Sindhudurg School : 67 शाळांचा पट दोन पेक्षा कमी; जिल्ह्यात घटत्या लोकसंख्येमुळे शाळा चालवणे कठीण

जिल्ह्यात घटत्या लोकसंख्येमुळे शाळा चालवणे कठीण
sindhudurga schools प्रातिनिधिक फोटो
sindhudurga schools प्रातिनिधिक फोटो esakal

ओरोस : जिल्ह्यात तब्बल ६७ शाळांची पटसंख्या १ किंवा २ अशी आहे. या शाळांमध्ये एकूण ११४ विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी ५९ शिक्षक कार्यरत आहेत. पटसंख्या कमी होण्यामागे शाळांचा शैक्षणिक दर्जा, मुले खासगी शाळांकडे वळण्याचे वाढते प्रमाण अशी पारंपरिक कारणे सांगितली जातात; मात्र पटसंख्या घटण्याचे मूळ कारण जिल्ह्यातील कमी झालेले लोकसंख्येचे प्रमाण हे आहे.

सिंधुदुर्ग हा शिक्षणात पुढारलेला जिल्हा म्हणून ओळख निर्माण करून आहे; परंतु हा जिल्हा राज्यातील सर्वात लहान जिल्हा आहे. लोकसंख्येतही हा जिल्हा सर्वांत कमी आहे. त्याचा दृश्य परिणाम शाळांच्या पटसंख्येवर दिसतो. काही वर्षांपूर्वी पटसंख्येपेक्षा जास्त मुले शाळेत होती; मात्र आता नेमकी उलटी स्थिती आहे.

एका इयत्तेला एक विद्यार्थी मिळताना मुश्कील झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात घटलेली दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १३८४ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यातील १५ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही. याचा अर्थ विद्यार्थ्यांअभावी येथील शाळा बंद आहे.

sindhudurga schools प्रातिनिधिक फोटो
Sindhudurg Rain : सह्याद्री पट्ट्यात मुसळधार; धबधब्याखाली अडकलेल्या 24 पर्यटकांची पोलिसांनी 'अशी' केली सुटका

कमी पटसंख्या हा विषय कठीण बनत चालला आहे. जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या शाळांमधील एक ते पाच पटांच्या २२९ शाळा आहेत. दहा पटांच्या ४९५ शाळा आहेत. २० पटांच्या ८४६ शाळा आहेत. यावरून जिल्ह्यातील शाळांची पटसंख्या लक्षात येत आहे. घसरती पटसंख्या शाळा बंद होण्याचे प्रमुख कारण ठरणार आहे.

शासनाने जर दहा पटांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, तर एका झटक्यात जिल्ह्यातील ४९५ शाळा बंद होणार आहेत; मात्र कमी पटसंख्येच्या बहुसंख्य शाळा दुर्गम ग्रामीण भागातील किंवा दुर्गम वाडीवस्त्यातील आहेत. अशा ठिकाणी शाळा बंद झाल्यास नवा प्रश्न निर्माण होणार आहे. लहान मुलांना शिक्षणासाठी किती दूर पाठवायचे, याला मर्यादा आहे.

यामुळे घटलेल्या पटसंख्येवर शाळा बंद करणे, हा उपाय योजल्यास आजारापेक्षा इलाज गंभीर होणार आहे. घसरलेल्या पटसंख्येमुळे भविष्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षक भरतीत सिंधुदुर्गात कमी शिक्षक पदे भरली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

sindhudurga schools प्रातिनिधिक फोटो
Sindhudurg Flood : सिंधुदुर्गात वरुणराजाची जोरदार मुसंडी, कणकवलीला महापुराचा धोका; आंबोली, करुळ घाटात कोसळल्या दरडी

शाळांचे समायोजन हवे पण...

एक विद्यार्थी असला तरी तेथे एक शिक्षक दिला जातो; परंतु तो विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही कंटाळतात. यातून मुलांचे शैक्षणिक नुकसानच होत असते. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तीन किलोमीटर परिसरातील शाळांचे समायोजन करण्याचे धोरण जिल्ह्यात राबविणे आवश्यक आहे; मात्र ते राबवताना बंद पडलेल्या शाळा परिसरातील मुलांसाठी ते कितपत व्यवहार्य आहे, हेही ठरवायला हवे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कमी होणाऱ्या लोकसंख्येचा परिणाम विद्यार्थी संख्येवर होत आहे. ही कमी होणारी विद्यार्थी संख्या शाळांचे भवितव्य धोक्यात आणत आहेत. तसेच कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांतील मुलांचा शैक्षणिक विकास होत नाही.

या मुलांना स्पर्धात्मक विकास होत नाही. कारण कमी विद्यार्थ्यांत स्पर्धा होऊ शकत नाही. परिणामी भविष्यात या मुलांचा स्पर्धा परीक्षांमध्ये टिकाव लागण्यासाठी खूप कठीण स्थिती आहे. जास्त मुले असली तर मुलांना बौद्धिक विकास चांगला होतो. शिक्षक शिकविण्यापेक्षा विद्यार्थी एकमेकांच्या संभाषणातून शिकतात, ते खूप महत्त्वाचे असते.

- महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

तालुकानिहाय विद्यार्थ्यांची संख्या अशी...

school and student
school and studentsakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com