नारायण राणे कोणाच्या गळ्यात घालणार माळ; अध्यक्ष पदासाठी दोघे दावेदार

दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की, तिसऱ्याच व्यक्तीला लॉटरी लागणार.
Narayan-Rane
Narayan-Raneesakal

ओरोस: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sindhudurg Bank Election) नवीन संचालक मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ डिसेंबर रोजी होत आहे. जिल्हा बँकेवर भाजपाची (BJP) सत्ता आली आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळतो ? भाजप नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) कोणाच्या गळ्यात या पदांची माळ घालतात याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर व मनीष दळवी (Atul Kalsekar, Manish Dalvi) यांनी नावे आघाडीवर असून या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब होते की तिसऱ्याच व्यक्तीला लॉटरी लागते, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा बँक निवडणूक एवढ्या मोठ्या प्रमाणात लक्षवेधी झाली आहे. बँकेसाठी ३० डिसेंबर रोजी मतदान होऊन ३१ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली होती. ही निवडणूक भाजप एकटा सिद्धिविनायक परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात होते. तर राज्यात सत्तेत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन पक्ष सहकार समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून रणांगणात होते. एकीकडे भाजप व दुसरीकडे अनुभवी शिलेदार घेऊन महाविकास आघाडी अशी स्थिती असल्याने ही निवडणूक रोमांचक होईल, हे स्पष्ट झाले होते. मात्र, १८ जानेवारी रोजी शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर निवडणुकीचा कल बदलला.

Narayan-Rane
जिल्हा बँकेच्या घडामोडींना येणार वेग; राष्ट्रवादीला मिळणार संधी?

केंद्रीयमंत्री नारायण राणे ठाण मांडून जिल्ह्यात होते. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ नितेश राणे, आ प्रसाद लाड भाजपकडून तर महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खा विनायक राऊत, आ दीपक केसरकर, आ वैभव नाईक प्रचारात उतरले होते. त्यातच आ नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने व अटक होऊ नये यासाठी ते भूमिगत झाल्याने निवडणूक निकाल काय लागतो ? याची उत्सुकता होती. मात्र, निकाला दिवशी एक एक निकाल बाहेर येऊ लागताच भाजपची सत्तेकडे वाटचाल तर महाविकास आघाडीची पराभवाकडे वाटचाल सुरू झाली. भाजपने ११ जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळविली. तर महाविकास आघाडीला ८ जागांवर समाधान मानावे लागले.

त्यानंतर लक्ष लागून राहिलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी निवडणूक होत आहे. अतुल काळसेकर हे मागच्या संचालक मंडळात होते. तसेच ते जुने भाजप पदाधिकारी आहेत. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, राज्यात सत्ता महाविकास आघाडीची आहे. या सत्तेच्या आडून जिल्हा बँकेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न विशेषतः शिवसेना करणार आहे. त्यामुळे त्यांना तोडीस तोड उत्तर देणारा अध्यक्ष पाहिजे, अशीही प्रतिक्रिया भाजप गोटातून उमटत आहे. त्यामुळे मनीष दळवी यांचे नाव पुढे येत आहे. दळवी हे हुशार व अभ्यासू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मनीष दळवी यांची वर्णी लागणे सुद्धा शक्य आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना पदाधिकारी निवडीवेळी धक्कातंत्र वापरण्याची सवय आहे. तसा प्रयोग त्यांनी केल्यास घरबांधणी मतदार संघातून निवडून आलेल्या गजानन गावडे यांची वर्णी लागू शकते. गावडे हे सध्या मजूर फेडरेशन अध्यक्ष आहेत. त्यांनी जिल्हा बँकेवर पाच वर्षे संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा स्वभाव शांत, संयमी व अभ्यासू आहे. परिणामी त्यांनाही लॉटरी लागू शकते. अतुल काळसेकर व्यतिरिक्त अध्यक्ष बसविण्यात आल्यास काळसेकर यांना उपाध्यक्ष पदी संधी मिळू शकते. एकंदरीत या जर तर च्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात कोणाला संधी मिळते ? कोणाची हुकते ? हे निवडीवेळी स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com