Narayan Rane Replied to Kankavli Police
Narayan Rane Replied to Kankavli Policesakal

Sindhudurg District Bank Election: आता लक्ष महाराष्ट्रात सत्ता आणण्याकडे, नारायण राणेंच विधान

सुशांत नाईक विजयी होत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव करून बँकेमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला आहे.

ओरोस : कणकवली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (Sindhudurg District Bank Election)भाजपप्रणीत आघाडीने 31 सत्ता मिळवली आहे. शेवटचा निकाल हाती आला तेव्हा 19 पैकी भाजप नऊ तर विकास आघाडी पाच जागांवर विजयी झाले. काही वेळेतच अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. म्हणून निकालाची एकूण परिस्थिती पाहता भाजप या बँकेच्या पॅनलवर बहुमताने विजयी होईल अशी शक्यता आहे. (Sindhudurg DCC Bank Election Result Updates)

भाजपच्या गोटात कमालीचा उत्साह आहे. मात्र, विकास आघाडीच्या गोठामध्ये कमालीची शांतता पसरली आहे. महाविकास आघाडीचे दिग्गज संचालक पराभूत झाले आहेत. यामध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत (Satish Savant) यांच्यासह अविनाश माणगावकर, विकास सावंत यांचा समावेश आहे. आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांचे भाऊ कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक हे मात्र विजयी होत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव करून बँकेमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला आहे.

जाणून घ्या महत्वाच्या घडामोडी (Sindhudurg DCC Bank Election Result Updates)

  • नितेश राणेंसोबत अटपूर्व जामीन नाकारलेल्या मनीष दळवी यांचा वेंगुर्ल्यातून विजय

  • पहिल्या फेरीत सावंतवाडीतून सेनेचे परब तर, भाजपचे रावराणे विजयी

  • कणकवलीत सेनेला धक्का; सावंत यांचा पराभव, भाजपचे विठ्ठल देसाई विजयी

  • कणकवली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपप्रणीत आघाडीने 31 जागांवर सत्ता मिळवली आहे.

  • भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव.

  • सिंधुदुर्ग बँके निवडणूकीत भाजपचं वर्चस्व

  • मविआच्या समृद्धी विकास पॅनेल पॅनलला ७ जागा.

  • सिद्धिविनायक परिवर्तन पॅनेलला १० जागा

  • अखेर राणेंने सिंधुदुर्गचे मैदान मारलचं; शिवसेनेचा सुपडा साफ

  • आता लक्ष महाराष्ट्रात सत्ता आणण्याकडे, नारायण राणेंच विधान

  • 36 मतं मिळत नाही आणि विधानसभेची गोष्ट करतात.

  • विधानसभा, लोकसभा

  • महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री नाही, राज्याची वाटचाल अधोगतीकडे.

  • राज्याला भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे. 'लगाम'ची टिम नको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com