esakal | सिंधुदुर्ग : भाजपचे जिल्ह्यात तब्बल ९१६ बुथ स्थापन
sakal

बोलून बातमी शोधा

sindhudurg

सिंधुदुर्ग : भाजपचे जिल्ह्यात तब्बल ९१६ बुथ स्थापन

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी : जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या भाजपच्या बुथ संपर्क अभियानामध्ये 916 बुथ गठीत करण्यात आले आहेत. या कामी जिल्हा संयोजक महेश सारंग यांनी आपली जबाबदारी योग्य पार पाडली. जिल्हावासियांनीही याला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे भविष्यातील सर्व निवडणुका जिंकण्याची तयारी भाजपाची असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केला.

येथील भारतीय जनता पार्टीच्या तालुका संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा चिटणीस महेश सारंग, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सदस्य चंद्रकांत जाधव, माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर, कमलाकांत परब, आदी उपस्थित होते.

श्री. तेली म्हणाले, ``भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून बुथ संपर्क अभियान राबवण्यात आले होते. या अभियानाची जबाबदारी जिल्हा संयोजक म्हणून सारंग यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत जिल्ह्यात तब्बल 916 बुथ गठीत केले. 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त या बुथ कमिट्यांच्या अध्यक्षांशी स्वतः संपर्क साधून मार्गदर्शन करण्याची मागणी मी केली आहे. भविष्यात कुठल्याही निवडणुका आल्या तरी जिल्ह्यात 916 बुथवर 1 अधिक 30 असे विस्तृत बूथ कमिटी तयार करण्यात आली आहे. महिला व युवा मोर्चा यांचीही कार्यकारणी बनवण्याचे काम सुरू आहे.``

हेही वाचा: भारतात कोरोनावर हेटेरोच्या औषध वापराला DCGIकडून मंजुरी

ते पुढे म्हणाले, ``केंद्रीय नेतृत्वाने दिलेली जबाबदारी पार पाडताना बुथ संपर्क अभियानाच्या माध्यमातून केंद्राने जनतेसाठी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोचवण्याचे कामही करण्यात आले. यामध्ये उज्वला गॅस योजना, शेतकरी सन्मान योजना तसेच घरकुल योजना आदी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आलेली आहे. केंद्राने लॉकडाउनमध्ये तब्बल ८० कोटी लोकांपर्यंत मोफत धान्य पोहोचवले आहे. याबाबतही सर्वसामान्यांना जाणीव करून देण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीकडून भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. ज्याची सोबत येण्याची तयारी आहे, त्यांना सोबत घेतले जाणार. अन्यथा या सर्व निवडणुका जिंकण्याच्या इराद्याने आम्ही रिंगणात उतरणार आहोत.``

loading image
go to top