esakal | सिंधुदुर्गात कोरोनाचा तांडव; तीस दिवसांत 5 हजार 350 बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात कोरोनाचा तांडव; तीस दिवसांत 5 हजार 350 बाधित

सिंधुदुर्गात कोरोनाचा तांडव; तीस दिवसांत 5 हजार 350 बाधित

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) : कोरोनाची खरी दहशत सिंधुदुर्गवासीयांनी एप्रिल 2021 मध्ये अनुभवली. या महिन्यात रुग्णसंख्या शीघ्र गतीने वाढलेली दिसली तर मार्चपर्यंत जिल्ह्याचा 2 च्या जवळपास असलेला मृत्यूदर झपाट्याने वाढला. कोरोना टेस्ट सुद्धा वाढल्या. एप्रिलमध्ये तब्बल 5 हजार 350 नवीन रुग्ण आढळले. 143 जणांचा मृत्यू झाला असून 3 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 27 हजार 244 टेस्ट करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात 26 मार्च 2020 ला पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. एप्रिलच्या 29 तारीखला दुसरा रुग्ण आढळला होता. त्यानंतर संख्या वाढत गेली. जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरमध्ये जास्त रुग्ण आढळले होते. मार्च 2021 पर्यंत 13 महिन्यांत 7 हजार 122 रुग्ण आढळले. 6 हजार 499 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 183 रुग्ण मृत झाले तर 72 हजार 322 कोरोना टेस्ट झाल्या होत्या.

हेही वाचा- सिंधुदुर्गात ऑक्सीजन स्फोटची 'ती' अफवाच

सुरुवातीला जिल्ह्यात ऑक्‍सिजन बेड, आयसीयू, कोरोना निदान केंद्र कमी होते. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णाची काही प्रमाणात परवड होत होती. कालांतराने या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोरोना निदान केंद्र सुरु झाले. अगदी अलीकडे कोरोना चाचणीची दुसरी मशीन कार्यान्वित करण्यात आली.

एवढी यंत्रणा उपलब्ध असताना ही सर्व यंत्रणा एप्रिल 2021 या एका महिन्यात कमी पडली. एवढी दहशत कोरोनाने या महिन्यात माजविली आहे. एका महिन्यात 5 हजार 350 एवढे विक्रमी रुग्ण मिळाले आहेत. 7 हजार 122 वर 31 मार्चला असलेली एकूण बाधित संख्या 12 हजार 472 वर पोचली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. 31 मार्चला 6 हजार 499 रुग्ण कोरोनामुक्त होते. आता यात 3 हजार 528 एवढी वाढ झाल्याने एकूण कोरोनामुक्त संख्या 10 हजार 27 झाली आहे.

गेल्या 31 दिवसांत 143 बळी गेले आहेत. 31 मार्चला 183 वर असलेली कोरोना मृत्यु संख्या 326 झाली आहे. 31 मार्चला 434 सक्रिय रुग्णसंख्या होती. एप्रिलमध्ये ही संख्या 3 हजाराच्यावर गेली होती. 30 एप्रिलला 2 हजार 113 रुग्ण सक्रीय आहेत. विशेष म्हणजे एका महिन्यात कोरोना टेस्ट लाखाच्या जवळ पोचली आहे. 31 मार्चला ही संख्या 72 हजार 322 होती. आता ती 99 हजार 566 झाली आहे. तब्बल 27 हजार 244 टेस्ट करण्यात आल्या आहेत.

आढळलेले रुग्ण

(2020) ः मार्च 1, एप्रिल 1, मे 54, जून 160, जुलै 161, ऑगस्ट 916, सप्टेंबर 2518, ऑक्‍टोबर 1090, नोव्हेंबर 384, डिसेंबर 596.

2021 ः फेब्रुवारी 198, मार्च 680, एप्रिल 5350.

जिल्ह्यातील मृतांची संख्या

- 2020 ः मे 1, जून 5, जुलै 1, ऑगस्ट 16, सप्टेंबर 74, ऑक्‍टोबर 32, नोव्हेंबर 15, डिसेंबर 13.

- 2021 ः जानेवारी 11, फेब्रुवारी 6, मार्च 9, एप्रिल 143.

Edited By- Archana Banage

loading image