सिंधुदुर्ग : कोटीच्या अपहारप्रकरणी अल्पबचत एजंटवर गुन्हा

कुडाळातील प्रकार बनावट पासबुक बनवली
crime
crimesakal

कुडाळ: येथील पोस्ट कार्यालयाची बनावट पासबुक बनवून अल्पबचत एजंट पूजा संदीप रुद्रे यांनी सुमारे १ कोटी १ लाख ५९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आज येथील पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत मालवण डाक निरीक्षक सचिन राजाभाऊ पानढवळे यांनी तक्रार दाखल केली आहे. ही माहिती पोलिस निरीक्षक प्रेमचंद मेंगडे यानी दिली.

मालवण डाक निरीक्षक पानढवळे यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, अल्पबचत एजंट पूजा संदीप रुद्रे यांनी १४ मार्च २०१५ ते २४ मे २०१९ या कालावधीमध्ये एकूण १०४ बनावट पासबुके बनवून ३६ ठेवीदारांकडून १ कोटी १ लाख ५९ हजार रुपये घेऊन ही रक्कम पोस्ट खात्यात न भरता ती स्वतःसाठी रक्कम वापरली आणि अपहार केला. बनावट पासबुके बनवून पोस्टातील सहायक पोस्टमास्टर यांचा रबरी पदनाम शिक्का याचाही गैरवापर केला. पोस्ट खाते आणि ठेवीदारांची फसवणूक केली म्हणून पोस्ट खात्याचे व्यवहार त्यांचे रद्द करण्यासाठी आणि त्यांची एजन्सी बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार २३ जून २०१९ ला त्यांची नेमणूक रद्द करण्यात आली.

दरम्यान, फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी पूजा रुद्रे यांच्याविरोधात पोस्ट कार्यालयात तक्रार दाखल केली होती; मात्र हा अपहार उघडकीस आल्याचे समजल्यावर त्यांनी ठेवीदारांशी संपर्क साधून त्यांच्या रकमा परस्पर आदा केल्या. त्यामुळे ठेवीदारांनी पूजा रुद्रे आणि पोस्ट विभागाबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे लेखी निवेदन दिले आहे. दरम्यान, कुडाळ पोलिस ठाण्यात अल्पबचत एजंट पूजा रुद्रे विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com