सिंधुदुर्ग जिल्हा आता होणार ‘डिजिटल साक्षर’

अमोल टेंबकर
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

सावंतवाडी - साक्षरता अभियानात शंभर टक्के साक्षर जिल्हा म्हणूून देशात नाव कमविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पुन्हा एकदा डिजिटल साक्षरतेसाठी कंबर कसली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एका वर्षात तब्बल जिल्ह्यातील २८ हजार लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवून ग्रामीण भागातील लोकांना प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्हा प्रशासनाने याची जबाबदारी सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या परिवर्तन फाऊंडेशनकडे दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर संबंधित संस्थेकडून महिला बचत गट, पुरुष बचत गट, भजनी मंडळ आदींना साक्षर केले जाणार आहे. यात प्रत्येक गावासाठी २५० चे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात डिजिटल इंडियाचे वारे वाहू लागले आहे. हा प्रयोग राबविताना देशातील प्रत्येक नागरिकाने ऑनलाईन व्यवहार करावे तसेच इंटरनेटचे सहाय्य घेऊन काम सहज करावे हा त्या मागचा उद्देश आहे. या पार्श्‍वभूमिवर देशात सगळीकडे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियात राबविले जात आहे.

अभियानाची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून स्वीकारण्यात आली आहे. यापूर्वी १९९४-९५ मध्ये शंभर टक्के साक्षर जिल्हा म्हणून नावारूपास आला होता. आता पुन्हा एकदा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील गावागावात जाऊन त्याठिकाणी असलेल्या लोकांना डिजिटल साक्षरतेचे धडे दिले जात आहे.

याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘या ठिकाणी परिवर्तन फाऊंडेशनकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील किमान अडीचशे लोकांना डिजिटल साक्षरतेचे धडे देणे बंधनकारक आहे. त्यासाठी कॅम्प किंवा उपक्रम राबवून त्याठिकाणी आलेल्या १४ ते ६० वयोगटातील लोकांना याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. यात एसटी एनटी, ओबीसी आणि ओपन या सर्व प्रवर्गातील लोकांचा समावेश असणे बंधनकारक आहे.’’

आम्ही यशस्वी होवू... 
याबाबत परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशिल आमुणेकर म्हणाले,‘‘शासनाकडुन राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा लाभ आम्ही गावागावात देणार आहोत. त्यात ऑनलाईन व्यवहार कसे करावे, दाखले कसे मिळवावेत यांच्यासह गुगलचा वापर शिकविण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात निश्‍चितच आम्ही जिल्हा डिजीटल साक्षर करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: sindhudurg digital Literate