नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

सिंधुदुर्गनगरी : देवगड नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासह सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून देवगड, जामसंडे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसह सावंतवाडी उपनगराध्यक्ष निवड 23 ला होणार आहे. मालवण व वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 22 ला होणार आहे. ही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सिंधुदुर्गनगरी : देवगड नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासह सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून देवगड, जामसंडे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसह सावंतवाडी उपनगराध्यक्ष निवड 23 ला होणार आहे. मालवण व वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 22 ला होणार आहे. ही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण नगरपालिकांसह देवगड - जामसंडे नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता देवगड नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासह सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले पालिकांच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये मालवण व वेंगुर्ले पालिकांच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक 22 ला होणार आहे. तर सावंतवाडी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासह देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 23 ला होणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर करणे 19 ला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत, नामनिर्देशन पत्राची छाननी 2 वाजता, नामनिर्देशन पत्रे फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची नावे व त्यामागची कारणे प्रसिद्ध करणे सायंकाळी 5 वाजता, 21 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांना अपील दाखल करता येणार आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहे. 22 ला दुपारी 4 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेणे, 23 ला दुपारी 12 वाजता निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची नावे घोषित करणे; तर आवश्‍यक असल्यास 23 ला दुपारी 12.15 नंतर निवडणुकीचे मतदान व निकाल जाहीर केले जाणार आहेत.

सावंतवाडी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी 23 ला सकाळी 10 ते 12 नामनिर्देशनपत्र सादर करणे, दुपारी 12.30 ते 1 नामनिर्देशन पत्राची छाननी करणे, वैध उमेदवारांची नावे दुपारी एकनंतर जाहीर करणे, नामनिर्देशनपत्रे मागे घेणे 1.15 वाजेपर्यंत, निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारांची नावे घोषित करणे दुपारी 1.30 वाजता तर आवश्‍यक असल्यास मतदान प्रक्रिया राबविणे व निकाल दुपारी 2.45 नंतर जाहीर करणे असा निवडणूक कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे.

मालवण आणि वेंगुर्ले पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार नामनिर्देशन पत्र सादर करणे, 22 ला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्राची छाननी करणे दुपारी साडेबारा ते एकपर्यत, वैध उमेदवारांची नावे जाहीर करणे दुपारी एकनंतर, उमेदवारी नामनिर्देशन पत्र मागे घेणे दुपारी 1.15 नंतर, निवडणूक लढविणाऱ्या वैध उमेदवारांची नावे घोषित करणे दुपारी दीड वाजता व त्यानंतर आवश्‍यक असल्यास मतदान प्रक्रिया दुपारी 2.45 वाजता घेऊन त्यानंतर निकाल जाहीर करणे असा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. या सर्व निवडणुकीसाठी संबंधित प्रांताधिकारी निवडणूक पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

Web Title: sindhudurg- elections declared