Sindhudurg : कर्मचारी पतसंस्थेचा निकाल जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या १७ जागांसाठी निवडणूक लागली होती.
sakal
sakalsindhudurg

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या आठ जागांसाठीची मतमोजणी आज सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था सभागृहात पार पडली. यावेळी सूरज देसाई, संतोष परब, श्रीकृष्ण मुळीक, न्हानु दळवी, अमित तेंडोलकर, गीतांजली वालावलकर, शमिका घाडीगांवकर, विठ्ठल मालंडकर हे उमेदवार विजयी झाले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या १७ जागांसाठी निवडणूक लागली होती. यातील ९ जागा बिनविरोध झाल्याने शिल्लक आठ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी ९ सप्टेंबरला जिल्ह्यातील ९ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. प्रत्येक तालुक्यासाठी एक व जिल्हा मुख्यालय अशा केंद्रांचा यामध्ये समावेश होता. यासाठी ८६० मतदार निश्चित झाले होते. यातील ६२४ मतदारांनी मतदान केल्याने ७२.५५ टक्के मतदान झाले होते.

वेंगुर्ले तालुका संचालक पदाच्या एका जागेसाठी मुतुल सातार्डेकर, सूरज देसाई आणि अर्जुन नाईक हे तीन उमेदवार रिंगणात होते. जिल्हा मुख्यालय मतदारसंघातून चार संचालक निवडून द्यायचे होते. यासाठी शोभराज शेर्लेकर, संतोष परब, राजेश नाईक, श्रीकृष्ण मुळीक, संजीव गोगटे, न्हानु दळवी, अमित तेंडोलकर, योगेश तावडे हे आठ उमेदवार रिंगणात राहिले होते. दोन महिला राखीव जागांसाठी मधुबाला फाले, गीतांजली वालावलकर, शमिका घाडीगांवकर, समिधा ठाकूर हे चार उमेदवार रिंगणात होते. भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या जागेसाठी लक्ष्मण डोईफोडे आणि विठ्ठल मालंडकर यांच्यात निवडणूक झाली. या सर्व उमेदवारांचे भवितव्य काल (ता.९) मतपेटीत बंद झाले होते.

वेंगुर्ले तालुका संचालक पदाच्या एका जागेसाठी ६२ मतदान झाले होते. यात मुतुल सातार्डेकर १२, सूरज देसाई ४३ आणि अर्जुन नाईक ६ अशी मते मिळाली. एक मत नकारार्थी झाले होते. त्यामुळे येथे सूरज देसाई तब्बल ३१ मतांनी विजयी झाले.

जिल्हा मुख्यालय मतदारसंघातून चार संचालक निवडून द्यायचे होते. यासाठी २०१ मतदान झाले होते. यात शोभराज शेर्लेकर ५८, संतोष परब १०६, राजेश नाईक ७३, श्रीकृष्ण मुळीक ९९, संजीव गोगटे ७८, न्हानु दळवी १०३, अमित तेंडोलकर ११८, योगेश तावडे ६५ अशी आठ उमेदवारांना मते मिळाली. यात सर्वाधिक मते मिळाल्याने अमित तेंडोलकर, संतोष परब, न्हानु दळवी, श्रीकृष्ण मुळीक हे विजयी झाले.

दोन महिला राखीव जागांसाठी ६२४ मतदान झाले. यात मधुबाला फाले २६७, गीतांजली वालावलकर ४१०, शमिका घाडीगावकर ३०५,मतमोजणीवेळी धाकधूक; अन् विजयाचा जल्लोष समिधा ठाकूर १७६ अशी मती मिळाली. यात गीतांजली वालावलकर, शमिका घाडीगांवकर हे दोन उमेदवार विजयी झाले.

भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या जागेसाठी ६२४ एवढे मतदान झाले होते. यातील १० मते नकारार्थी पडली होती. त्यामुळे शिल्लक ६१४ मतांतील लक्ष्मण डोईफोडे यांना २५७ आणि विठ्ठल मालंडकर ३५७ मते मिळाली. विठ्ठल मालंडकर हे १०० एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. या पतसंस्थेचे एकूण १७ संचालक निवडून द्यायचे होते. यामध्ये आठ तालुक्यांतून आठ व जिल्हा मुख्यालयातून चार असे एकूण बारा संचालक सर्वसाधारण मधून निवडून द्यायचे होते. महिला राखीव, अनुसूचित जाती जमाती एक, इतर मागास प्रवर्ग एक आणि भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग एक अशाप्रकारे प्रतिनिधी निवडून द्यायचे होते.

या १७ संचालक पदापैकी तालुका मतदार संघातील दोडामार्ग तालुक्यातून शुभम मुळीक, कुडाळमधून विनोद राणे, सावंतवाडीमधून एकनाथ सावंत, कणकवली मधून निलेश मयेकर, मालवणमधून संतान फर्नांडिस, वैभववाडी मधून विशाल चौगुले या जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर जिल्हा मतदार संघ असलेल्या इतर मागास प्रवर्ग मधून सुनील बाणे आणि अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून आनंद चव्हाण बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित आठ जागांसाठी मतदान प्रक्रिया घेतली होती.

जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती यु. यु. यादव यांच्या नियंत्रणाखाली सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था सभागृहात पार पडली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पतसंस्था सचिव विजय आंदुर्लेकर, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील श्रीकृष्ण मयेकर, नंदिनी सामंत, प्रशांत साळगावकर, राजन आरावंदेकर, प्रेमानंद जाधव, अतुल मालंडकर, विलास सावंत आदी कर्मचारी प्रक्रियेत सहभागी होते.

अशी पार पडली मतदान प्रक्रिया

सकाळी १० वाजता मोजणी सुरू झाली. पेपरद्वारे मतदान झाल्याने पहिले सर्व मतपेट्या फोडत त्याची विभागणी करण्यात आली. पहिला वेंगुर्ले तालुका मतमोजणी शांततेत पार पडली. यानंतर भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग, जिल्हा मुख्यालय, दोन महिला राखीव जागांचा अशाप्रकारे एकामागून एक निकाल जाहीर करण्यात आला. एकूण तीन टेबलवर ही मोजणी झाली.

निवडून आलेले संचालक (कंसात मते)

वेंगुर्ले ः सूरज देसाई (३१) जिल्हा मुख्यालय ः संतोष परब (१०६), श्रीकृष्ण मुळीक (९९), न्हानु दळवी (१०३), अमित तेंडोलकर (११८)दोन महिला राखीव ः गीतांजली वालावलकर(४१०), शमिका घाडीगांवकर (३०५) भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग ः विठ्ठल मालंडकर (३५७)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com