FDA action against food businesses in Sindhudurg
esakal
सिंधुदुर्गनगरी : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी ८२ तपासण्या करून ४७ नमुने घेतले. यामध्ये १९ सुधारणा नोटिसा व १२ व्यवसायांना बंद नोटिसा बजावण्यात (Sindhudurg gutkha seizure latest news) आल्या. कारवाईतून एक लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच गुटखा विक्रीविरोधात सहा कारवाया करून २२ लाख २४ हजार ९६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, विभागाकडे प्राप्त झालेल्या ३३ तक्रारींपैकी ३० तक्रारींचा निपटारा करण्यात आला.