Sindhudurg: बेकायदा दारूला जिल्ह्यात चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wine shop

सिंधुदुर्ग : बेकायदा दारूला जिल्ह्यात चाप

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ७ महिन्यांत जिल्ह्यात ४६४ गुन्ह्यांची नोंद झाली. यात ५९ वाहनांसह ७ कोटी ७५ लाख ६१ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ३३२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही माहिती मिळाली.

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारू वाहतूक व विक्रीवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे विविध २० पदे रिक्त असूनही कमी मनुष्यबळाच्या जोरावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने भरीव कामगिरी केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने एप्रिल ते ऑक्टोबर या गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये देशी विदेशी मद्य, बियर, वाइन तसेच इतर मद्य कारवाईमध्ये जप्त करण्यात आले.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून २०२० या वर्षांत एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत ५२० गुह्यांची नोद करून ३१० अरोपींना संशयितांना अटक करून त्यांच्याकडून ६५ वाहने व १ कोटी ६३ लाख ४६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. २०२१ या आर्थिक वर्षातील सात महिन्यात एकूण ४४६ गुन्हे दाखल करत ३३२ संशयितांना अटक करण्यात आली. ७ कोटी ७५ लाख ६१ हजार ७१५ रुपयांचा जादा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात १३२ परमिट रूम, ११७ बीअर शॉपी, ४४ देशी तर १ वाइन शॉप कार्यरत आहेत.

एप्रिल ते आॅक्टोबरची (२०२०) कारवाई

दाखल झालेले गुन्हे ५२०

अटकेतील संशयित ३१०

जप्त केलेली वाहने ६५

जप्त केलेला मुद्देमाल १ कोटी ६३ लाख ४६ हजार ५८० रुपये

सात महिन्यांतील (२०२१) कारवाई

एकूण दाखल गुन्हे ४६४

अटकेतील संशयित ३३२

जप्त केलेला मुद्देमाल ७ कोटी ७५ लाख ६१ हजार ७१५ रुपये

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

विनापरवाना देशी-विदेशी तसेच गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारे व चोरटी दारू विक्री करणाऱ्यांविरोधी गेल्या काही महिन्यांत विविध ठिकाणी कारवाई झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६ कोटी १२ लाख १५ हजार १३५ रुपये एवढा जादा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- बी. एच. तडवी, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

loading image
go to top