सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कुपोषणाची समस्या कायम

जिल्ह्यात कुपोषणाचे संकट कायम असून
malnutrition
malnutritionsakal

सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यात कुपोषणाचे संकट कायम असून, विविध उपाययोजनांनंतरही सद्यस्थितीत ९६० बालके कमी वजनाची (मॅम), तर ५४ बालके तीव्र कमी वजनाची (सॅम) अशी एकूण एक हजार १४ कुपोषित बालके आहेत. जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली.जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील ३७ हजार ७६६ बालके आहेत. या बालकांपैकी ३७ हजार ७४४ बालकांचे मार्चअखेर वजन घेण्यात आले. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील मिळून मार्चअखेर कमी वजनाच्या (मॅम) बालकांची संख्या ९६० आहे. यापैकी १३० बालकांमध्ये सुधारणा झाली; तर तीव्र कमी वजनाच्या (सॅम) बालकांची संख्या ५४ एवढी आहे. यापैकी १३ बालकांमध्ये सुधारणा दिसून येत असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात एक हजार ५९३ कार्यरत अंगणवाडी केंद्रे असून, आठही तालुक्यांतील मिळून शून्य ते सहा वयोगटातील ३७ हजार ७६६ सर्वेक्षित बालकांपैकी ३७ हजार ७४४ बालकांचे मार्चअखेर वजन घेण्यात आले. यात सावंतवाडी तालुक्यातील सहा हजार ३५७, कणकवली- सहा हजार ६३७, मालवण- तीन हजार ७५६, वेंगुर्ले- तीन हजार ३०५, कुडाळ- सात हजार ८८१, वैभववाडी- एक हजार ८८८, देवगड- पाच हजार ३४२, दोडामार्ग- दोन हजार ५७८ बालकांचा समावेश असून, यात तीव्र व कमी वजनाची मिळून एक हजार १४ बालके असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात मार्चअखेर कमी वजनाच्या (मॅम) बालकांची संख्या ९६० आहे. यापैकी १३० बालकांमध्ये सुधारणा झाली. कुडाळ तालुक्यातील कमी वजन असणाऱ्या बालकांचा आकडा २०० हून अधिक आहे. कमी वजन असणाऱ्या बालकांमध्ये सावंतवाडी १५६, कणकवली १३१, मालवण १०३, वेंगुर्ले १०६, कुडाळ २२२, वैभववाडी ३६, देवगड १४६ व दोडामार्ग तालुक्यातील ६० बालकांचा समावेश आहे. यापैकी १३० बालकांमध्ये सुधारणा झाली. यात सावंतवाडी १५, कणकवली १५, मालवण ३, वेंगुर्ले २४, कुडाळ ३८, वैभववाडी ७, देवगड १८ व दोडामार्ग तालुक्यातील १० बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात मार्चअखेर तीव्र कमी वजन असलेल्या (सॅम) बालकांची संख्या ५४ आहे. यापैकी १३ बालकांमध्ये सुधारणा झाली. तीव्र कमी वजन असणाऱ्या बालकांमध्ये सावंतवाडी १४, कणकवली ४, मालवण ८, वेंगुर्ले २, कुडाळ १४, वैभववाडी ३, देवगड ७, दोडामार्ग तालुक्यातील दोन बालकांचा समावेश आहे. यापैकी १३ बालकांमध्ये सुधारणा झाली. यात सावंतवाडी २, कणकवली २, मालवण ३, वेंगुर्ले १, देवगड तालुक्यातील ५ बालकांचा समावेश आहे.

कुपोषणाची अनेक कारणे

कमी वजनाची मुले जन्माला येण्याची अनेक कारणे आहेत. त्यात कमी वयात मुलांना जन्म देणे, मुलांमधील अंतर योग्य न राखणे, जन्म देणाऱ्या मातेचे वजन कमी असणे आणि पोषक व योग्य आहार नसणे अशी अनेक कारणे आहेत. त्यासाठी प्रसूतिपूर्व योग्य आहार आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com