शिक्षक बदल्यांसाठी  वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - शिक्षक बदलीचे नवे धोरण वादग्रस्त ठरले असतानाच राज्याने आता जिल्हांतर्गत विनंती बदल्यांसाठी वेळापत्रक जारी केले आहे. शिक्षकांनी १७ ते २१ या कालावधीत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन सरल  प्रणालीद्वारे विनंती अर्जासाठी ऑनलाईन नोंद करायची आहे. तसे आदेश राज्याचे उपसचिव गिरीश भालेराव यांनी काढले.

जिल्हांतर्गत बदल्या ३० मेपर्यंत करण्याचे आदेश शासनाने शिक्षण विभागाला दिले होते. 

यंदा शिक्षक बदलीचे धोरण बदलण्यात आले. या धोरणाच्या विरोधात काही शिक्षक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने शिक्षक बदलीस १६ जूनपर्यंत स्थगिती दिली होती. जिल्ह्यात शिक्षक बदल्यांच्या विरोधात आंदोलनही केले.

स्थगितीची मुदत संपल्याने राज्याने बदल्यांबाबतचे नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विनंती बदलीस पात्र असणाऱ्या शिक्षकांनी १७ ते २१ या कालावधीत जिल्हांतर्गत बदलीसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शासनाच्या सरल प्रणालीवर अर्ज भरायचा आहे. पोर्टलवर माहिती भरताना ती काळजीपूर्व भरणे आवश्‍यक आहे. कारण एकदा भरलेली माहिती बदलता येणार नाही.

दरम्यान, शिक्षक बदल्यांच्या नव्या धोरणाच्या विरोधात संघटनांच्या समन्वय समित्यांनी एकत्र येत आंदोलने केली आहेत. त्यामुळे नव्याने जारी केलेली प्रक्रिया तरी अंतिम असावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Sindhudurg Nagari news teacher