सिंधुदुर्गातील सुमारे 50 माकडताप रुग्ण उपचारासाठी गोव्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

बांदा - डोंगरपाल आणि डेगवे परिसरात माकडतापाची तीव्रता वाढली आहे. म्हापसा आणि बांबूळी येथील रूग्णालयामध्ये परिसरातील जवळपास 50 रूग्ण माकडताप सदृश्‍य तापावर उपचार घेत आहेत. काही घरातील एकापेक्षा जास्त सदस्यही रूग्णालयात दाखल आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आरोग्यमित्र या नावाने कक्ष कार्यान्वित केला आहे.

डोंगरपालमध्ये माकडतापाची तीव्रता खुपच वाढली आहे. तापाच्या भितीने लोकांनी काजू वेचण्याचे कामही बंद केले आहे. गेल्यावर्षी बांदा सटमटवाडीवर तशी स्थिती ओढवली होती. तसाच प्रकार डोंगरपालबाबत घडत आहे. डेगवे परिसरातही माकडतापाचे रूग्ण वाढू लागले आहेत. सध्या म्हापशाच्या अजिलो रूग्णालयात आणि बांबुळीच्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मिळून सुमारे 50 माकडताप सदृश्‍य रूग्ण दाखल आहेत. यातील बहुसंख्य याच भागातील आहेत.

"गोमेकॉ'त आरोग्यमित्र कक्ष सुरू
दोडामार्ग येथील जनआक्रोश आंदोलनानंतर बांबुळी येथे जिल्ह्यातील रूग्णांसाठी कक्ष उभारण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले कर्मचारी दाखल झाले.
 
Web Title: Sindhudurg News 50 Monkey Fever cases in district