५ हजार ८०० कोटींच्या जुन्या नोटा बॅंकांमध्ये पडून - आनंदराव अडसूळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

सावंतवाडी - सहकार क्षेत्रातील ३१ जिल्हा बॅंकांचे ५ हजार ८०० कोटी रुपये व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा आजही बॅंकांत पडून आहेत, असा दावा को-ऑप. बॅंक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे केला. नोटबंदी व ‘जीएसटी’मुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

सावंतवाडी - सहकार क्षेत्रातील ३१ जिल्हा बॅंकांचे ५ हजार ८०० कोटी रुपये व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा आजही बॅंकांत पडून आहेत, असा दावा को-ऑप. बॅंक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे केला. नोटबंदी व ‘जीएसटी’मुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

श्री. अडसूळ यांनी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय आणि आरपीडी हायस्कूलला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शहरप्रमुख शब्बीर मणियार, सी. एल. नाईक, माजी नगरसेवक विलास जाधव आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘ब्लॅक, व्हाईट पैशाच्या व्यवहारात अडकलेल्या सर्वांनाच नुकसान सोसावे लागले आहे. यामुळे सुमारे १५ लाख कामगारांना धक्का बसला आहे. नोटबंदीचे योग्यप्रकारे नियोजन झाले नाही. यात निश्‍चितच घाईगडबड झाली आहे. जीडीपी घसरल्यानेही अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. फेब्रुवारीत रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरनी निर्णय घेऊ नका, असे सुचविले होते; मात्र पंतप्रधानांनी नोव्हेंबरमध्येच नोटबंदी जाहीर केली. त्याचे परिणाम जनतेला सोसावे लागत आहेत. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या आघातातून सावरण्यासाठी सरकार आता प्रयत्नात आहे. सहकारी क्षेत्रातील ३१ जिल्हा बॅंकांची ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. जिल्हा बॅंकांचे चलनच अडकले आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी जिल्हा बॅंकांना अडचणीची ठरली आहे. यामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. कोकणातील जिल्हा बॅंका सक्षम आहेत.’’

पेट्रोलियमवरील टॅक्‍स समान करायचा प्रयत्न आहे. सहकार क्षेत्रातील बॅंकांसाठी सरकारने तोडगा काढावा, यासाठी शरद पवार भेटले. तसेच मीही स्वतंत्र भेट घेऊन व्यथा मांडली असल्याचेही श्री. अडसूर म्हणाले.

Web Title: Sindhudurg News Anandrao Adsul comment