कुडाळात २२ पासून राज्यस्तरीय पशुपक्षी मेळावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

कुडाळ - चौथ्या राज्यस्तरीय कृषी पशुपक्षी मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर २२ ते २६ या कालावधीत शेती, पशुपक्षीबाबत विविध परिसंवाद, महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा येथील विविध पशुपक्षी, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद  उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली.

कुडाळ - चौथ्या राज्यस्तरीय कृषी पशुपक्षी मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर २२ ते २६ या कालावधीत शेती, पशुपक्षीबाबत विविध परिसंवाद, महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा येथील विविध पशुपक्षी, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद  उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली.

राज्यस्तरीय कृषी पशुपक्षी मेळावा येथील नवीन डेपोच्या जागेत होत आहे. जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने हा मेळा होत आहे. शुक्रवारी रात्री पिंगुळी येथे देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. 

या वेळी ते म्हणाले, ‘‘२२ ला सकाळी १० वाजता औपचारीक प्रारंभ होईल. सकाळी आरोग्य शिबीर होणार आहे. सायंकाळी ५ वाजता कोकणी पारंपारिक फुगड्या, ७ वाजता दशावतार होणार आहे. २३ ला सकाळी ९ वाजता बैलगाडी सजावट स्पर्धा, सकाळी १० वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मुख्य उद्‌घाटन सोहळा होणार आहे. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, अधिकारी वर्ग, नगरसेवक यांची उपस्थिती असणार आहे.

सायंकाळी ५.३० वाजता डॉग शो होणार. रात्री ८ वाजता स्वरसंध्या कार्यक्रम होणार. २४ ला सकाळी १० वाजता कुक्कुटपालन कार्यशाळा व पशुपालकांचा सत्कार होणार आहे. दुपारी ३ वाजता मालवणी गीतांची मैफल, सायंकाळी ५ वाजता जादूचे प्रयोग, ७ वाजता पखवाज ढोलकी जुगलबंदी कार्यक्रम, रात्री ८ वाजता नृत्याविष्कार, २५ ला सकाळी १० वाजता कृषी परिसंवाद, ११.३० वाजता मार्गदर्शन कार्यक्रम, ३ ते ६ जनावरांच्या विविध स्पर्धा आहेत. सायंकाळी ७ वाजता २०-२० डबलबारी सामना होणार आहे. २६ ला सकाळी १० वाजता जिल्हा बॅंकेच्या सहकार्याने काजू परिषद, ३ वाजता पारितोषिक वितरण समारंभ, ७ वाजता साई कलामंच निर्मित केदार देसाई लिखित व दिग्दर्शित दोन अंकी नाटक अशुद्ध बीजापोटी आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.’’

दरम्यान, या ठिकाणी लहान मुलाना लयलुट आनंद लुटता यावा यासाठी मजेची जत्रा होणार आहे. मंडपातच ॲमझॉन पार्क उभारण्यात येणार आहे. गेल्यावर्षी या मेळाला १ लाख ४८ हजार लोकांनी भेटी दिल्या. त्यावेळी नोटाबंदी असतांनाही ४ कोटी १६ लाखाची उलाढाल झाली होती असे श्री. देसाई यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी जिल्हा बॅंकेशी संपर्क साधावा.

Web Title: Sindhudurg News animal-bird fest in Kudal