सावंतवाडीत रिंग रोडसाठी मोजणी सुरू - बबन साळगावकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सावंतवाडी - शहराच्या विकासात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या रिंग रोडची मोजणी प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. आजपासून याला शुभारंभ करण्यात आला. याबाबतची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

सावंतवाडी - शहराच्या विकासात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या रिंग रोडची मोजणी प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. आजपासून याला शुभारंभ करण्यात आला. याबाबतची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

स्वच्छ सर्वेक्षण या कार्यक्रमाअंतर्गत येथील पालिकेच्या कारिवडे येथील कचरा डेपोवर दुर्गंधी मिटविण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात आले आहेत. त्याठिकाणी कचऱ्यापासून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यात येत आहे. याबाबतची पाहणी श्री. साळगावकर यांनी केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘सावंतवाडी महोत्सवाच्या दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरातून दोन महामार्ग जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी साडेचारशे कोटी मंजूर झाल्याचे सांगितले होते. त्या रस्त्यासाठी मोजणीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे नवा रिंगरोड लवकरच प्रत्यक्षात येईल यात काही शंका नाही.’’

श्री. साळगावकर पुढे म्हणाले, ‘‘हा रिंग रोड मार्गी लागल्यानंतर त्याचा फायदा शहराला होणार आहे. हे काम लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईल. ज्याठिकाणी अतिक्रमण आहे त्यांना नुुकसानभरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे विरोध होणार नाही असा विश्‍वास आहे.’’ ते म्हणाले, ‘‘कारीवडे कचरा डेपोच्या ठिकाणी कचऱ्याची दुर्गंधी रोखण्यासाठी कल्चर पद्धत अवलंबिण्यात आली होती. आता त्या ठिकाणी माती टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे. नव्याने येणारा कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची खास टीम नेमण्यात आली आहे. शहरात अन्य ठिकाणी हा गांडूळ खत प्रकल्प उभारण्यात आला आहे.’’

प्लास्टिक क्रश करणार 
आरोग्य सभापती आनंद नेवगी म्हणाले, ‘‘पालिकेने प्लास्टिक क्रश करण्याचे मशीन आणले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. येथील काझी शहाबुद्दीन हॉल मध्ये ही प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्‍न सुटणार आहे.’’

Web Title: Sindhudurg News Baban Salgaonkar comment