सावडाव धबधब्याचे साैंदर्य खुलले (व्हिडिआे)

अनंत पाताडे
रविवार, 10 जून 2018

कणकवली -  कोकणात माॅन्सून सक्रीय झाला असून गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आेढे, नाले तुंडूंब भरून वाहू लागले आहेत. फेसाळलेल्या पाण्यानेही धबधब्यांचे साैंदर्य आता खुलले आहे.

कणकवली -  कोकणात माॅन्सून सक्रीय झाला असून गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आेढे, नाले तुंडूंब भरून वाहू लागले आहेत. फेसाळलेल्या पाण्यानेही धबधब्यांचे साैंदर्य आता खुलले आहे.

कोकणात पहिला पाऊस पडला की पर्यटकांना कोकणातील धबधब्यांचे वेध लागतात. कणकवली तालुक्यातील सावडाव येथील धबधबा आता प्रवाहीत झाला आहे. कणकवली शहरापासून 15 किमी अंतरावर हा धबधबा आहे. पहिल्याच पावसामध्ये तुडूंब भरून वाहणारा हा धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. 20 ते 30 फूट उंचावरून मोठया प्रमाणात पाण्याचा प्रवाह पडत आहे. फेसाळलेले पाणी आणि उडणारे तुषार याचे वेध आता पर्यटकांना लागलेले आहेत.

Web Title: Sindhudurg News Beauty of Savdav waterfall