ब्रॉडबॅंड बंदमुळे परीक्षांवर परिणाम होणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

कणकवली - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आली असून माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) विषयाची ऑनलाईन परीक्षा १५ ते १७ मार्चला होत आहे. मात्र, जिल्ह्यातील बीएसएनएल ब्रॉडबँड सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. 

कणकवली - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आली असून माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) विषयाची ऑनलाईन परीक्षा १५ ते १७ मार्चला होत आहे. मात्र, जिल्ह्यातील बीएसएनएल ब्रॉडबँड सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम खारेपाटण ते झाराप या परिसरात सुरू आहे. या महामार्गावर बीएसएनएलची ओएफसी केबल रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली होती.

रुंदीकरणामुळे जेसीबी यंत्रणेतून अशा केबल तुटल्या जात आहेत. त्यामुळे गेल्या शनिवारपासून चार दिवस बीएसएनएलची ब्रॉडबॅंड सेवा पूर्ण ठप्प आहे. याचा कामकाजावर परिणाम होत आहे. मात्र, उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावीच्या आयटी परीक्षेबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे कासार्डे, कणकवली आणि कनेडी या बारावीच्या परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. 

याबाबत भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘बीएसएनएलचे अधिकारी महामार्ग प्राधिकरण विभागाचे अभियंता तसेच ठेकेदाराकडील जबाबदार मंडळींची संयुक्त बैठक यापूर्वी घेतलेली आहे. बीएसएनएल ब्रॉडबॅंड सेवा ठप्प होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

भारत दूरसंचार निगमचे विभागीय उपअभियंता ढाणेपाटील यांच्याशीही संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘महामार्गावरील रस्ता रुंदीकरणामुळे बीएसएनलची ओएफसी केबल वारंवार तुटत आहे. त्यासाठी बीएसएनएलने विशेष पथक ठेवलेले आहे.’’

Web Title: Sindhudurg News Broadband band affects on exams