सावंतवाडी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू

अमोल टेंबकर
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

सावंतवाडी - कलंबिस्त येथे रूपा तुकाराम सावंत यांच्या गोठ्यातील वासरावर वाघाने हल्ला केला. यात वासराचा मृत्यू झाला. यात सावंत यांचे 10 हजारांचे नुकसान झाले आहे. दरम्यान वाघ थेट नागरीवस्तीत व घरातही येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  

आंबोलीसह सह्याद्री पट्ट्याला जोडून असलेल्या कलंबिस्त, वेर्ले , सांगेली पंचक्रोशीत गेले काही दिवस पट्टेरी वाघाचा वावर आहे. वाघाचे अस्तिव वारंवार उघट झाले आहे. दरम्यान  गुरुवारी रात्री भर वस्तीतच्या बाजूला असलेल्या ब्राम्हणआळीतील गोठ्यात वाघाने बांधलेल्या वासरावर हल्ला केला. मात्र वासरू बांधलेले असल्यामुळे त्याला ते पूर्ण खाता आले नाही. हा प्रकार सुरू असताना अनेकांनी वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकला.

सकाळी या प्रकारची कल्पना सावंत यांना शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी दिली. मात्र भीतीने कोणी त्याठिकाणी गेले नाही. दरम्यान आज सकाळी घटनेचा पंचनामा करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी श्री खवणेकर, वनरक्षक शीतल पाटील यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सरपंच बाळू सावंत, पोलीस पाटील गजानन राऊळ, उपस्थित होते.

याबाबत वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.  त्याठिकाणी गोवा ते संह्याद्री घाट या परिसरात त्या वाघाचा वावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News calf dead in tiger attack