`कंझ्युमर्स`चे चेअरमन प्रमोद गावडे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

सावंतवाडी - येथील कंझ्युमर्स सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तूर्तास त्या ठिकाणी उमा वारंग यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

सावंतवाडी - येथील कंझ्युमर्स सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तूर्तास त्या ठिकाणी उमा वारंग यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

गेली सात वर्षे अध्यक्षपदावर असलेल्या गावडे यांनी नेमका हा निर्णय का घेतला याबाबत कळू शकले नाही; मात्र रिक्त झालेल्या पदावर सदस्य लक्ष्मीकांत पणदूरकर यांची वर्णी लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या पक्षांनी कन्झुमर्स सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत आपापली पक्षीय शस्त्रे म्यान करुन स्वाभिमान पक्षाचे प्रमोद गावडे यांना एकमताने चेअरमनपदी निवड केली. त्यांनी आपल्या काळात संस्थेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी चांगले प्रयत्न केले होते तसेच संस्थेचा स्वत:चा मॉल असावा असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी ते प्रयत्नशील होते.

कन्झुमर्सच्या दोन दुकानातील करप्रणालीमुळे त्रस्त असल्यामुळे सहकारात ना नफा ना तोटा या तत्वाखाली ही संस्था चालविणे जिकरीचे बनले आहे. गावडे यांनी या संस्थेत गेली सात वर्षे चेअरमनपद भूषविले असून त्यांना थेट सरपंचपदाची लॉटरी लागली. निरवडे सरपंचपदी ते निवडून आले असून सहकारात कन्झुमर्स सोसायटी नावारुपाला आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते बाहेरगावी असल्यामुळे राजीनाम्याबाबत त्याच्याशी संपर्क होऊ शकत नाही. याबाबत त्यांच्या निकटर्तीयांशी संपर्क साधला असता ते केरळ दौऱ्याहून आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन बोलतील असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Sindhudurg News Consumer Society Chairman Pramod Gavade resign