चाराटकरांच्या एका शिट्टीवर मगरी येतात धावत

चाराटकरांच्या एका शिट्टीवर मगरी येतात धावत

इन्सुली - माणूस आणि प्राण्याची मैत्री किती घट्ट असू शकते याची जगभरात  विविध उदाहरणे आहेत, मात्र कोकणात  मगरींच्या सानिध्यात राहणारा माणूस आहे.  त्याच्या एका शिट्टीवर पाण्यातून मगर धावत येते. त्यांचे नाव आहे रामचंद्र चाराटकर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात इन्सुली येथे रामचंद्र चाराटकर राहतात.  त्याच्या घराशेजारी तेरेखोल नावाची नदी आहे. या नदीत मगरींचे वास्तव्य आहे. या परिसरात 40 ते 50 मगरी आहेत. 
रामचंद्र रोज या नदीवर जातात. शिट्टी मारतात. पाण्यात उतरतात. त्यांच्या या शिट्टीची भुरळ मगरींना पडली आहे. त्यांच्या सहवासाची या मगरींना सवय झाली आहे. त्यांनी शिट्टी वाचवली की मगरी लगेच त्यांच्या आवाजाकडे धावून येतात. हा त्यांचा रोजचा कार्यक्रम, पण कुणाला माहीत की त्यांची ही शिट्टी  मगरींच्या हृदयाला किती दस्तक देतेय. आज या मगरी आणि रामचंद्र यांच्यात एक अनोखी मैत्री निर्माण झाली आहे. 

गेल्या पाच-सहा वर्षापासून येथे मगरींची पैदास होत आहे. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना पाहण्यासाठी आणि मगर रामचंद्र शिट्टी हा संवाद पाहण्यासाठी पर्यटक इथे भेट देत आहेत. यामुळे आता इन्सुलीची आेळख आता मगरींचे गाव अशी झाली आहे. 

जिल्हा परिषद किंवा पालकमंत्र्यांनी तेरेखोल नदीच्या या परिसरात इको फ्रेन्डली काॅक्रेडाईल पार्कची उभारणी केल्यास पर्यटकांची संख्या वाढू शकते. या नव्या व्यवसायाने इन्सुली गावाच्या विकासालाही चालना मिळू शकेल. 

- रामचंद्र चाराटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com