सावंतवाडी मोती तलावाच्या पाण्यात घट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सावंतवाडी - शहरातील विहिरींच्या पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या येथील मोती तलावाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सावंतवाडी - शहरातील विहिरींच्या पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या येथील मोती तलावाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एकीकडे पालिकेची नळपाणी योजना असली तरी अनेक लोक विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कमी होणाऱ्या पाण्याची पातळीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 

शहराच्या मध्यभागी असलेला येथील मोती तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालतो; पण त्यापेक्षा शहरातील नैसर्गिक स्त्रोत जगविण्याचे काम या तलावाच्या पाण्याच्या माध्यमातून होते; मात्र गेले काही दिवस उन्हाळ्याचा कडाका वाढल्यामुळे तलावाच्या पाण्यात कमालीची घट झाली आहे. 

सद्यस्थिती लक्षात घेता उद्यानासमोरील तीन मुशीकडील भागातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसत आहे. जाणकारांच्या मते अनेक वर्षात एवढा तलाव आटला नव्हता. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे की अन्य कारणामुळे पाणी कमी झाले आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. 
त्याचा थेट परिणाम शहरातील नैसगिक स्त्रोतांवर होणार असल्यामुळे अनेकांतून चिंता व्यक्त केली जात आहे. 
 

पातळी वाढण्यासाठी मोठा निर्णय घेणार 
श्रीराम वाचन मंदिरसमोर बांधलेल्या गणपतीसान्यामुळे एक मीटर खाली पाण्याची पातळी ठेवावी लागत आहे. त्यामुळे भविष्यात त्याठिकाणी उंची वाढविण्यात आल्यास हा प्रश्‍न सुटू शकतो. त्यादृष्टीने भविष्यात नियोजन केले जाणार आहे.

- बबन साळगावकर, नगराध्यक्ष 

Web Title: Sindhudurg News decrease in water level Sawantwadi Moti Talav