कुणकेश्‍वर मंदिर दीपोत्सवाने उजळले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

देवगड - तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिरात दीपावली वार्षिक उत्सवानिमित्त दीपावली पाडव्यादिवशी मंदिरासह परिसरात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध ठिकाणच्या भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान, ‘दीपसंध्या’ हा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर झाला.

देवगड - तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिरात दीपावली वार्षिक उत्सवानिमित्त दीपावली पाडव्यादिवशी मंदिरासह परिसरात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध ठिकाणच्या भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान, ‘दीपसंध्या’ हा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर झाला.

दीपावली पाडव्याचे औचित्य साधून मंदिर आणि परिसरात दीपोत्सव करण्यात आला. येथील महाविद्यालयातील प्रा. डॉ. एल. बी. आचरेकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री देव कुणकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्‍वर विश्‍वस्त मंडळ, देवस्थानचे देवसेवक - मानकरी तसेच विविध मान्यवर, भाविक भक्‍तांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

डॉ. आचरेकर यांचा ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर, अरविंद वाळके, नरेश जोईल, बाळकृष्ण बोंडाळे, शैलेश बोंडाळे, प्रदीप मुणगेकर, राकेश वाळके, दिलीप चव्हाण, व्यवस्थापक रामदास तेजम, नंदा वाळके यांच्यासह अन्य उपस्थित होते. मंदिरातील गर्भागृह, ध्यानगृह, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर परिसरात बहुसंख्य दीप उजळण्यात आले होते. यासाठी अनेकांचे हात जुडले आणि बघताबघता मंदिर परिसर पणत्यांच्या प्रकाशात लख्ख उजळून निघाले.

या उत्सवादरम्यान आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळीचे आकर्षक कलात्मक नमुने पहावयास मिळाले. परिसरात विविध रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सिंधुदुर्गसह मिरज, कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या कलाकारांचा सन्मान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. 

मंदिर परिसरात स्वरधारा ग्रुप, देवगड यांचा ‘दीपसंध्या’ हा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये संदीप फडके, प्रियांका वेलणकर, शिल्पा दामले यांनी विविध गीते सादर केली. त्याला हार्मोनियम - संदीप फडके, तबला - प्रथमेश बोंडाळे, पकवाज - विनित मांजरेकर, टाळ - तेजस देसाई यांनी साथ केली.

Web Title: Sindhudurg News Deep Festival in Kunkeshwar Temple