वेंगुर्ले बंदर-नवाबाग पूल मे पर्यंत - दीपक केसरकर

वेंगुर्ले - पतंग महोत्सवाला दिलेल्या भेटीवेळी मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री दीपक केसरकर 
वेंगुर्ले - पतंग महोत्सवाला दिलेल्या भेटीवेळी मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री दीपक केसरकर 

वेंगुर्ले - येथील बंदर ते नवाबाग जोडणारा झुलता पर्यटन पूल केरळच्या धर्तीवर येत्या मे महिन्यापूर्वी पूर्णत्वास येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, गृह व ग्रामीण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पाकलमंत्री दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सवातील भेटीत केले.

"माझा वेंगुर्ला' संस्थेने पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवाबाग बीच येथे दोन दिवस आयोजित केलेल्य पतंग महोत्सवास आज पालकमंत्री केसरकर यांनी भेट दिली. 

श्री. केसरकर म्हणाले, ""माझा वेंगुर्ला संस्थेने पतंग महोत्सवातून पर्यटन वृद्धीचा प्रयत्न यशस्वीपणे राबविला आहे. हे बीच पर्यटकांच्या पसंतीत उतरलेले आहे. ज्या महोत्सवात, उपक्रमात देशी विदेशी पर्यटकांची हजेरी मोठ्या प्रमाणात असेल, अशा ठिकाणी भरविल्या जाणाऱ्या महोत्सव उपक्रमासाठी भविष्यात वर्गणी वा देणगीचा प्रश्‍न निर्माण होऊन नये.'' 

पतंग महोत्सवासाठी जलद व सोयीस्कर पोहचण्यासाठी मांडवी खाडी ते नवाबाग जोडणाऱ्या तरंगत्या जेटीवरुन पालकमंत्री केसरकर यांच्यासह माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी उदय चौधरी, तहसिलदार शरद गोसावी यांनी वाहवा केली. 
या पतंग महोत्सवात स्थानिकांनी लावलेल्या विविध प्रकारच्या खाद्य स्टॉलला, वाळूशिल्पांना माजी आमदार राजन तेली, भाजपाचे सरचिटणीस शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ग्लोबल कोकण संस्थेचे संजयराव यादव, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस निरिक्षक शिवाजी कोळी यांसह अन्य मान्यवरांनी तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. 

या वेळी पंचायत समिती सभापती यशवंत परब, नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश परब, उभादांडाचे सरपंच देवेंद्र डिचोलकर, शिवसेना तालुका प्रमुख बाळा दळवी, शहर प्रमुख विवेक आरोलकर, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, पंचायत समिती सदस्य सुनिल मोरजकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, सुनिल डुबळे, नगरसेविका सुमन निकम, सचिन वालावलकर, विवेक खानोलकर, निलेश चेंदवणकर, राजन गावडे, खेमराज कुबल, शशांक मराठे, कपिल पोकळे, जयंत बोवलेकर, राजेश घाटवळ, अमोल प्रभूखानोलकर, श्रीकृष्ण झांटये, अवधूत नाईक, वसंत तांडेल, प्रशांत आपटे, शरद मेस्त्री, सूर्यकांत खानोलकर, पंकज शिरसाट यांच्यासह अन्य सर्व सदस्यांचा समावेश होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com