देवगड हापूस वाशी बाजारात 

देवगड ः तालुक्‍यातील आंबा पेटी वाशी फळबाजारात पाठवण्यात आली. 
देवगड ः तालुक्‍यातील आंबा पेटी वाशी फळबाजारात पाठवण्यात आली. 

देवगड - यंदाच्या हंगामातील "देवगड हापूस' आंब्याची पेटी वाशी फळबाजारात पाठवण्यात आली. तालुक्‍यातील पडवणे येथील आंबा बागायतदार शेतकऱ्याच्या बागेत तयार झालेला आंबा फळबाजारात रवाना करण्यात आला आहे. त्यामुळे वेळेआधीच बाजारात हापूस आंबा ग्राहकांना पाहायला मिळाला. 

साधारणतः फेब्रुवारीनंतर हापूस फळबाजारात विक्रीला जाण्यास सुरूवात होते. मार्चनंतर याच्या प्रमाणात वाढ होते. सध्या तालुक्‍यात आंबा कलमांना पालवी तर काही ठिकाणी मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र काही प्रगतिशील बागायतदारांची उत्पादन घेण्यामध्ये आघाडी असल्याचे दिसते.

काहीवेळा पावसाळ्यात येणारा मोहोर टिकवून त्यापासून आंबा फळांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्‍यात पडवणे येथील अशाच एका बागायतदाराच्या बागेतील झाडाला आलेल्या मोहोराचे संरक्षण करून त्यापासून आंबा तयार झाला. हा तयार झालेला आंबा फळबाजारात पाठवण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्येच "देवगड हापूस' ग्राहकांच्या भेटीला गेला आहे. दरम्यान, फळबाजारातही आंबा पेटीचे उत्साही स्वागत झाल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com