हापूसचा दर उतरणीला 

भूषण आरोसकर
सोमवार, 7 मे 2018

सावंतवाडी - यंदा वातावरणातील बदलांचा फटका सहन करावा लागलेला हापूस आता स्थानिक बाजारपेठेत सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आला आहे. दोन दिवसापासून प्रति डझन 200 ते 150 रूपयांनी दर उतरणीला आले आहेत. बाजारपेठेत हापूसची आवक बऱ्यापैकी वाढली आहे. 

सावंतवाडी - यंदा वातावरणातील बदलांचा फटका सहन करावा लागलेला हापूस आता स्थानिक बाजारपेठेत सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आला आहे. दोन दिवसापासून प्रति डझन 200 ते 150 रूपयांनी दर उतरणीला आले आहेत. बाजारपेठेत हापूसची आवक बऱ्यापैकी वाढली आहे. 

वातावरणातील चढउतारामुळे आंबा मोहोर हंगाम लांबीवर पडला. अवकाळी पावसामुळे उत्पादनातही बरीच घट झाली. सुरवातीला म्हणजेच महिन्याभरापुर्वीच आंब्याचे दर वधारलेले होते; मात्र गेल्या दोन दिवसात चित्र पालटले. आंब्याची आवक वाढली. ग्राहकांचाही आंबा खरेदीकडे कल काहीसा वाढलेला आहे; मात्र काही ग्राहक हापूसची गेल्या वर्षीच्या दरात तुलना करीत असल्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या दराबाबत मात्र नाक मुरडत आहेत. गेल्यावर्षी याकाळात हापूसचा दर खूप खाली होता. त्यामुळे आणखी दर कमी होईल, अशी आशा बाळगणारा वर्गही मोठा आहे.

यंदा दाखल होण्याच्या टप्प्यात 400 रुपयांचा प्रति डझन दर हा नंतर 500 ते 600 रुपयापर्यंत होता. आता दर 300 ते 400 वर आला आहे. पुढच्या आठ दहा दिवसात तो आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे. सुरवातीला दोन डझनच्या पेटीतही 200 ते 400 रुपयापर्यत घट झाली आहे. पाऊस लवकर पडल्यास हापूसचा दर आणखी घसरण्याची शक्‍यता आहे. 

*प्रकार*सुरवातीलाचे दर*आताचे दर 
*हापुस*500 ते 600*300 ते 400 
*पायरी*400 ते 500*200 ते 250 
*केसर हापूस*400 ते 500*200 ते 250 
*गोवा माणकुर*600 ते 700*300 ते 400 
(प्रति डझन दर) 
 
कॅनिंगचा पर्याय 
कॅनिंगला पहिल्या टप्प्यातील आंबा बराच कमी मिळाला. दुसऱ्या टप्प्यातील काही आंबा अद्यापही झाडावर शिल्लक आहे; मात्र पाऊस पुढे गेल्यास हा आंबा कॅनिंगसाठी पाठविला जाण्याची शक्‍यता आहे. असे झाल्यास प्रक्रिया उद्योगांना निदान काही प्रमाणात तरी फायदा होवू शकतो. 

सध्या दमट हवामान आहे. पाऊसाचेही चिन्ह आहे. पुढील काही दिवसात पाऊस झाल्यास दर पुन्हा घसरण्यची शक्‍यता आहे. गेल्यावर्षीपेक्षा नसले तरी समाधानकारक व्यवसाय आहे. 
- अमित मठकर,
आंबा विक्रेता सावंतवाडी  

Web Title: Sindhudurg News down in Hapus Rate