आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटवर डॉ. केळकर नियुक्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

वेंगुर्ले - कोकण एज्युकेशन सोसायटी, अलिबाग (जि. रायगड) संस्थेच्या लोकनेते ॲड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी गणेश केळकर यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या अधिसभा (सिनेट) सदस्यपदी निवड झाली.

प्राचार्य डॉ. केळकर २९ वर्षे या महाविद्यालयात काम करत आहेत. २००१ ते २००५ या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या होमिओपॅथिक विद्या शाखेच्या अभ्यास मंडळावर तर २००६ ते २००९ पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या होमिओपॅथिक विद्या शाखेचे चेअरमन म्हणून तसेच विद्यापीठाच्या ॲकॅडमीक कौन्सीलवरही काम केले होते. 

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई बोर्ड ऑफ होमिओपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसीन, चंदीगड, मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, गोवा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पी. जी. गाईड आदी आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या विविध सुमारे ५२५ समितींवर आजपर्यंत काम केले आहे. निवडीबद्दल संजय पाटील, अजित शहा, विनायक खोपकर, शिवाजीराव कुबल, बापूसाहेब दाभोलकर, सुलोचना तांडेल, माजी सदस्य सायमन आल्मेडा, अनिल गडकर यांनी अभिनंदन केले.

Web Title: Sindhudurg News Dr. Kelkar appointed on Senate University of Health Sciences