अमली पदार्थ प्रकरणातील संशयितास ३० पर्यंत पोलिस कोठडी

भूषण आरोसकर
सोमवार, 29 जानेवारी 2018

सावंतवाडी - अमली पदार्थाचा साठा बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला लक्ष्मण सावंत याचे झाराप, माणगाव परिसराशी कनेक्‍शन असण्याची शक्‍यता आहे. त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता 30 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सावंतवाडी - अमली पदार्थाचा साठा बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला लक्ष्मण सावंत याचे झाराप, माणगाव परिसराशी कनेक्‍शन असण्याची शक्‍यता आहे. त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता 30 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सावंत याच्या घरावर यापूर्वी अनके वेळ पोलिसांनी धाड टाकली होती; मात्र मुद्देमाल हाती लागला नसल्याने तो सुटत असे अशी माहिती समोर येत आहे.

सोनूर्ली पोटये कुंभवाडी येथील सावंत याला शनिवारी (ता.27) सकाळी बांदा पोलिसानी अटक केली होती. यावेळी त्याच्या शेतात गांजा, पांढऱ्या रंगाची पावडर, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या आणि एक ठसणीची बंदूक आढळून आली होती. लक्ष्मण सावंत हा अमली पदार्थ विक्री करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. लक्ष्मण याने आपले आडनाव कायदेशीर प्रक्रिया करण्यापूर्वीच बदलले असल्याचेही तपासात पुढे आले आहे. तो आपल्या सोबत एका दुचाकी चालकाला घेऊन झाराप, माणगाव परिसरात जात असे त्यामुळे त्याचे त्या भागाशी काही संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. यातून तेथेही किंवा अन्य ठिकाणीही तो अमली पदार्थांचा पुरवठा करत होता का, यात आणखी कोण कोण आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. लक्ष्मण हा पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Sindhudurg News Drug substances case

टॅग्स