पर्यावरण दिनानिमित्त देवरुखमध्ये जनजागृती रॅली

प्रमोद हर्डीकर
मंगळवार, 5 जून 2018

साडवली - देवरुख आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या भुगोल विभागातर्फे मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टीक बंदी जनजागृतीसाठी सायकल रॅली काढली. रॅलीद्वारे देवरुख नगरपंचायत तसेच तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले.

साडवली - देवरुख आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या भुगोल विभागातर्फे मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टीक बंदी जनजागृतीसाठी सायकल रॅली काढली. रॅलीद्वारे देवरुख नगरपंचायत तसेच तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले.

या सायकल रॅलीत देवरुख महाविद्यालय भूगोल विभाग, एनसीसी, सायकल क्लब, निसर्ग मंच, सृष्टीज्ञान संस्था मुंबई यांनी सहभाग नोंदवला. प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर, संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्रा.सरदार पटेल, प्रा. मंदार जाखी, प्रा. उदय भाट्ये, प्रा. धनंजय दळवी, सृष्टीज्ञानचे कुणाल अणेराव आदींसह ५० सायकलस्वार रॅलीत सहभागी झाले.

देवरुख महाविद्यालयापासुन पर्यावरणाचा संदेश देत ही रॅली नगरपंचायतजवळ आली. या ठिकाणी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी निवेदन स्विकारले व नगरपंचायच पर्यावरणासाठी कटीबद्ध राहील 
अशी ग्वाही दिली. त्यानंतर ही सायकल रॅली बाजारपेठ शिवाजीचौक, सह्याद्रीनगर, सावरकर चौक मार्गे तहसील कार्यालयाजवळ गेली.

पर्यावरणपूरक मुद्दे असलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी तहसीलदार संदीप कदम यांनी स्विकारले.
पर्यावरण रक्षणासाठी सायकलचा वापर, प्लास्टीक बंदी कायम स्वरुपी करणे, घनकचरा, ओला कचरा याचे व्यवस्थापन योग्य करणे, सायकलींसाठी पार्कींग उपलब्ध करावे, डंपिंग ग्राउंड कचरा व्यवस्थापन करावे तसेच महाविद्यालयांना दर तीन महिन्यांनी पर्यावरण जनजागृतीसाठी सक्तीचे करणे असे मुद्दे मांडण्यात आले.

Web Title: Sindhudurg News Environmental Day Rally in Devrukh