सिंधुदुर्ग किल्ले वाहतूकीतील गाळाचा अडसर दूर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

मालवण - किल्ला दर्शनास नेणाऱ्या प्रवासी होडी वाहतुकीस अडथळा ठरणारा गाळ काढण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. काही वर्षे बंदर जेटी येथे वाहतुकीसाठी होड्या लावण्यासाठी निर्माण होणारी गैरसोय दूर झाली आहे. 

मालवण - किल्ला दर्शनास नेणाऱ्या प्रवासी होडी वाहतुकीस अडथळा ठरणारा गाळ काढण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. काही वर्षे बंदर जेटी येथे वाहतुकीसाठी होड्या लावण्यासाठी निर्माण होणारी गैरसोय दूर झाली आहे. 

बंदर जेटीनजीकच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. यामुळे पर्यटकांना किल्ले दर्शनास नेणाऱ्या प्रवासी होड्या ओहोटीच्यावेळी बंदर जेटीस लावताना अनेक समस्या निर्माण होत होत्या. किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्यावतीने सातत्याने यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधले; मात्र याची कार्यवाही होत नसल्याने किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्यावतीने पर्यटकांसाठी किल्ला दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याप्रश्‍नी आमदार वैभव नाईक यांनी तातडीने मेरीटाईम बोर्डाचे लक्ष वेधल्यानंतर बंदरातील गाळ काढण्याच्या कामास मंजुरी मिळाली. 

जानेवारीत बंदर जेटी समोरील समुद्रातील गाळ काढण्याच्या कामास सुरवात झाली. अखेर अडीच महिने चाललेल्या या कामात मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा करण्यात आला. त्यामुळे बंदर जेटी परिसरात होड्या लावताना निर्माण होणारी गैरसोय अखेर दूर झाली आहे. 

बंदर जेटी समोरील समुद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. यामुळे बंदर जेटीवर किल्ले दर्शनास जाणाऱ्या पर्यटकांना होडी लावताना अनेक समस्या निर्माण होत होती. याकडे सातत्याने शासनाचे आम्ही लक्ष वेधले; मात्र याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यानेच आम्हाला डिसेंबरमध्ये प्रवासी होडी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. याप्रश्‍नी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्‍न मार्गी लावला. त्यामुळे गाळ काढण्याचे काम सुरू झाले. अडीच महिन्यात बंदरातील गाळ मोठ्या प्रमाणात काढला गेल्याने किल्ला प्रवासी होडी वाहतुकीस भेडसावणारी मुख्य समस्या दूर झाली आहे. 
- मंगेश सावंत,
अध्यक्ष, किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना 

Web Title: Sindhudurg News excavation of mud from sea