खोरनिनको धरणाच्या पाणी साठ्याजवळ कचरा

रवींद्र साळवी
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

लांजा - तालुक्यातील खोरनिनको धरणाच्या पाणी साठ्याजवळ सिमेंटच्या पिशव्या, तसेच कचरा टाकल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. या कचऱ्यामुळे धरणातील पाणी दुषित होण्याचाही धोका आहे. तरी हा साठलेला कचरा हटविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

या धरणातील पाण्याचा परिसरातील नागरिकांना पुरवठा केला जातो. यासाठी धरणातील पाणी साठा शुद्ध ठेवण्याची गरज आहे. यासाठी धरण परिसरात कचरा होणार नाही याची काळजीही घेण्याची गरज आहे. कचऱ्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचाही हिरमोड होतो. पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी धरणाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा अशी मागणी केली जात आहे.

तालुक्यातील पुर्व भागातील प्रसिध्द व विस्तृत अशा मुचकुंदी नदीवर खोरनिनको येथे मोठे धरण बांधण्यात आले आहे. धरणाचा परिसर सुंदर असल्याने हे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. पावसाळ्यात येथे पावसाळी पर्यटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. तर हिवाळ्यात ही या परिसरात असणाऱ्या बल्लाल गणेश देवस्थान आणि शिवकालीन गुहा पाहण्यासाठी येणारे पर्यटक या धरणाला आवर्जून भेट देतात. पण परिसरात होत असलेल्या अस्वच्छतेमुळे पर्यटकांचा धरणाकडे जाण्याचा आेढा कमी होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News garbage near Khorninko water storage