सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावपळणची परंपरा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावपळणची परंपरा...

शिराळे - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी रुढी परंपरा पाहायला मिळतात. गावपळण ही एक अशीच प्रथा, परंपरा आहे. सुमारे 400 वर्षांपासून वैभववाडी तालुक्यातील शिराळे या गावची गावपळण ही एक प्रथा आहे.

गावपळण म्हणजे...

गावपळण म्हणजे संपूर्ण गावाने आपापला सगळा संसार सोबत घेऊन गावाबाहेर पाच दिवस आपला संसार मांडायचा. जनावरे, पाळीव प्राणी, कोंबड्या, गुरे, ढोरे सर्व वेशी बाहेर घेऊन जावे लागते. इतकेच काय शाळा सुद्धा पाच दिवस गावा बाहेरच भरवली जाते. 

भटकंती करणाऱ्यांची पाले जशी असतात तशी पाले गावाच्या वेशीबाहेर उभा करून सगळा गाव तेथे राहायला जातो. शिराळे या गावात ८० ते ९० घरे आहेत. या गावाची लोकसंख्या सुमारे ४०० च्या वर आहे. पण गावपळण मुळे संपूर्ण गावात स्मशान शांतता आहे. संपूर्ण गावच वेशीबाहेर सुट्टीवर गेला आहे. 

कोकणात कोठे कोठे आहे गावपळण परंपरा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात वायंगणी, आचरा व चिंदर, देवगड येथे मुणगे, वैभववाडीमध्‍ये शिराळे येथे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील वाघण आदी गावांमध्ये ‘गावपळण’ पाळली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com