कुडाळात राष्ट्रवादी स्वबळावर - बाळ कनयाळकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कुडाळ - राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्‍यातील ५४ ही ग्रामपंचायती निवडणुकीत स्वबळावर आपले उमेदवार उभे करणार आहे. यासाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत कुडाळ विधानसभा मतदार अध्यक्ष बाळ कनयाळकर यांनी सांगितले.

कुडाळ - राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्‍यातील ५४ ही ग्रामपंचायती निवडणुकीत स्वबळावर आपले उमेदवार उभे करणार आहे. यासाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत कुडाळ विधानसभा मतदार अध्यक्ष बाळ कनयाळकर यांनी सांगितले.

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांच्या कार्यालयात झाली. या वेळी माजी उपसभापती आर. के. सावंत, सावळाराम अणावकर, साबा पाटकर, रुपेश पावसकर, आत्माराम ओटवणेकर, शेख उपस्थित होते. 

कनयाळकर म्हणाले, ‘‘तालुक्‍यात ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. थेट सरपंच व आरक्षण निहाय आम्ही स्वबळावर प्रत्येक ठिकाणी उमेदवार देणार आहोत. कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. आतापर्यंत २० टक्के उमेदवार निश्‍चित झाले असून २९ ला सर्व उमेदवारांची यादी दिली जाईल. काही ठिकाणी गावांमध्ये गाव पॅनलखाली निवडणुका लढविल्या जातात. यामध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गाव पॅनलमध्येसुद्धा उभा राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. हे करताना राजकारण केले जाणार नाही. तालुक्‍यात निवडणुकीची जबाबदारी देण्यासाठी कोअर कमिटी गठीत करण्यात आली. यामध्ये माणगाव - आर. के. सावंत, नेरुर - रुपेश पावसकर, ओरोस-पणदूर- सावळाराम अणावकर, डिगस- शिवाजी घोगळे, पाट - साबा पाटकर तसेच प्रदेश अध्यक्ष अमित सामंत कार्यरत राहणार आहेत. आरक्षणनिहाय ५४ ही ग्रामपंचायतीवर थेट सरपंच निवडणुकीत उभे करणार आहोत.’’

ते म्हणाले, ‘‘राजकारण निष्ठावंत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस एकमेव राहिला असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा वर्ग असल्याने मतदार राष्ट्रवादीला साथ देतील. आम्ही किती जागांवर यश मिळवू याबाबत दावा करू शकत नाही; परंतु निश्‍चितच बऱ्याच ग्रामपंचायतीवर यश मिळवू.’’

नुकतीच निरीक्षक विलास माने यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यानुसार आमची वाटचाल आहे असेही कनसाळकर यांनी सांगितले.

Web Title: sindhudurg news Grampanchayat election