इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने बारावी परीक्षेवर परिणाम

तुषार सावंत 
शुक्रवार, 16 मार्च 2018

कणकवली - उच्चमाध्यमिक शालांत अर्थात बारावीच्या माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या दुसऱ्या दिवशीच्या ऑनलाईन परीक्षेवर मोठा परिणाम झाला. महामार्गालगत असलेली बीएसएनएलची केबल ओसरगाव, खारेपाटण आणि रत्नागिरी येथे तुटल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत तरी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा ठप्प होती. 

मुंबई -गोवा महामार्गाचे काम गेले सहा महिने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या ओएफसी केबल वारंवार तुटत आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा सातत्याने ठप्प होत आहे. मात्र बारावीची ऑनलाईन परीक्षा ही 15 ते 17 मार्च या कालावधीत असतानाही जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. या तीन दिवसात जिल्हा प्रशासनाने महामार्गाचे काम बंद ठेवण्याची गरज होती. मात्र या रस्ता रूंदीकरणाच्या कामाकडे जिल्हा यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने रूंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे.

परिणामी ठिकठिकाणी इंटरनेटच्या केबल तुटल्या जात आहेत. शुक्रवारी सकाळी ओसरगाव आणि खारेपाटण तसेच रत्नागिरी परिसरात ठिकठिकाणी या केबल तुटल्या होत्या. त्यामुळे कणकवली परिसरात इंटरनेट सेवा बंद झाली होती. त्यामुळे बारावीच्या माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या आजच्या दुसऱ्या ऑनलाईन परीक्षेवर परिणाम झाला आहे.

कासार्डे, कणकवली आणि कनेडी येथे ही परीक्षा केंद्रे आहेत. या परीक्षा केंद्रावर प्रत्येकी 20 बॅचप्रमाणे ऑनलाईन पेपर दिला जातो. दर तीन तासांनी या बॅचेस घेतल्या जातात. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने माहिती आणि तंत्रज्ञान विषयाचा दुसरा ऑनलाईन पेपर उशिरापर्यंत झाला नव्हता. 

Web Title: Sindhudurg News internet service affects on 12 th Exam