फणसगावातील भाजपचे कार्यकर्ते आडिवरेकर यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

देवगड - तालुक्‍यातील फणसगाव येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते जयवंत ऊर्फ भाई आडिवरेकर (वय ५२) यांचा मृतदेह घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

देवगड - तालुक्‍यातील फणसगाव येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते जयवंत ऊर्फ भाई आडिवरेकर (वय ५२) यांचा मृतदेह घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली. भाई यांच्या पत्नी जयश्री आडिवरेकर येथील पंचायत समितीच्या सभापती आहेत. घटनास्थळी विजयदुर्ग पोलिस रवाना झाले आहेत.

आडिवरेकर यांचा मृतदेह घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला; मात्र यामागील कारण समजू शकलेले नाही. विजयदुर्ग पोलिस तिकडे रवाना झाले होते. मृतदेह फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला होता. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. माहिती मिळताच भाजपचे माजी आमदार ॲड. अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी फणसगाव येथे धाव घेतली.

Web Title: Sindhudurg News Jayvant Adivarekar sucide