कणकवली नगरपंचायतीमध्ये आचारसंहितेनंतर राजकीय हालचाली गतिमान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

कणकवली - कणकवली नगरपंचायतीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर शहरातील सर्वच पक्षांतील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. यात ‘एकच लक्ष भाजपचा नगराध्यक्ष’ असा नारा देत भाजपकडून युवा नेते संदेश पारकर यांचे प्रचार कॅम्पेन सुरू केले आहे. दुसरीकडे गाव आघाडीकडूनही प्रभागनिहाय उमेदवार निश्‍चितीचे काम सुरू केले आहे. तर स्वाभिमान पक्षानेही मतदार संपर्क अभियानाची गती वाढवली आहे. 

अंतिम मतदार यादी निश्‍चित होत नसल्याने नगरपंचायतीची आचारसंहिता रखडली होती. सोमवारी रात्री निवडणूकीची अधिसूचना जाहीर झाली, त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदार गाठीभेटींना वेग दिला आहे. तर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांची उद्‌घाटने व इतर कार्यक्रम बंद झाले आहेत.

आगामी विधानसभेत आपली ताकद दाखविण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार आहे. त्याला टक्‍कर देण्यासाठी काही दिवसापूर्वी शिवसेना आणि भाजप नेत्यांनी महत्वपूर्ण बैठक घेतली. यात युती करून निवडणुका लढविण्याबाबत एकमत झाले आहे. मात्र भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावरच लढविण्याची आग्रही भूमिका घेतली आहे.

शहराच्या सत्ता परीघामध्ये शहरातील प्रमुख मानकरी मंडळींना अल्प प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले आहे. पुतळोजी राणे हे इथल्या राणे वतनदार कुटुंबातून कनकनगरीचे सरपंच झाले होते. त्यानंतर शहरातील सरपंच अथवा नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातीलच नगराध्यक्ष असावा. तसेच सर्वच प्रभागातून शहरातील स्थानिकांना संधी मिळायला हवी अशी भूमिका घेऊन शहर विकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे. या आघाडीकडूनही प्रभागनिहाय उमेदवार निश्‍चिती सुरू केली आहे.

निवडणुकीत शहर आघाडी देखील उतरणार असल्याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसणार आहे. त्यावरही मात करण्यासाठी सध्या स्वाभिमानसह भाजप आणि शिवसेना पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election