कणकवलीत ११ उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

कणकवली - येथे नगरपंचायत निवडणुकीसाठी आज ११ उमेदवारांनी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केले. यात भाजपच्या ६, शिवसेनेच्या ३ तर काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी एक अर्जाचा समावेश आहे. सोमवारी (ता. १९) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने, या दिवशी उच्चांकी अर्ज दाखल होण्याची शक्‍यता आहे.

कणकवलीच्या राजकारणात स्वाभिमान आणि राष्ट्रवादी पक्षांची आघाडी झाली आहे. तर भाजप-शिवसेना युती होण्यासाठी भाजपची नेतेमंडळी आग्रही आहेत. युती करण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी नकार दिल्यानंतर शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांच्याशी आज भाजप नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र दिवसभरात युतीबाबत समाधानकारक तोडगा निघालेला नाही. दरम्यान, गाव आघाडी, महाराष्ट्र स्वाभिमान यांच्याकडून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. तर मनसे निवडणूक रिंगणात असण्याबाबत साशंकता आहे.

शहरातील प्रभाग १ मधून सुवर्णा चंद्रशेखर राणे (शिवसेना), प्रभाग ५ मधून अश्‍विनी गजानन मोरये (शिवसेना), प्रभाग ९ मधून मेघा महेश सावंत (भाजप), प्रभाग १० मधून शीतल रामदास मांजरेकर (भाजप), प्रभाग ११ मधून महानंद राजाराम चव्हाण (काँग्रेस) आणि सुजित प्रकाश जाधव (शिवसेना), प्रभाग १३ मधून प्रशांत मुरलीधर नाईक (अपक्ष), किशोर विष्णू सोगम (भाजप) आणि विलास बाळकृष्ण कोरगावकर (काँग्रेस), प्रभाग १४ मधून राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर (भाजप) आणि प्रभाग १५ मधून प्रिया अमित मयेकर (भाजप) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

सर्वच पक्षांतील उमेदवारांचे एकाच दिवशी अर्ज दाखल होणार असल्याने निवडणूक विभागाचीही धावपळ होण्याची शक्‍यता आहे. त्याअनुषंगाने प्रत्येकी तीन प्रभागांतील अर्ज तपासणीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

Web Title: Sindhudurg News Kankavli Nagarpanchayat election