कुवळे येथील तलाठी लाच घेताना जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

देवगड - जमिनीचे सातबारा आणि फेरफारमध्ये नोंद घेण्यासाठी दीड हजारांची लाच घेताना कुवळे येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सापळा लावून पकडले. मारुती सुबराव सलाम (वय ४३) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शंकर चिंदरकर यांनी दिलेली माहिती अशी - एका वादग्रस्त जमिनीच्या दाव्याचा निकाल संबंधितांच्या बाजूने झाला. प्रांतांनी दिलेल्या निकालानुसार सातबारा व फेरफारमध्ये नोंद घेण्यासाठी संबंधिताकडे तलाठ्याने सुमारे तीन हजारांची लाच मागितली. त्यानुसार पहिला हप्ता म्हणून सुमारे दीड हजार रुपये देण्याचे ठरले. याची माहिती संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार लाचलुचपतने पडताळणी करून आज सापळा रचला. संबंधित तक्रारदाराकडून सुमारे दीड हजारांची लाच घेताना तलाठी सलामला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. येथील तहसील कार्यालय परिसरात कारवाई करण्यात आली. 
 
Web Title: Sindhudurg News Kuvale Talathi arrested in Bribe case