मांगेली धबधब्याजवळील पुलास धोका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

दोडामार्ग - मांगेली धबधब्याजवळील पुलाच्या पायाचा भाग सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे निखळला आहे. तत्काळ दुरुस्ती न केल्यास पूल कोसळण्याची भीती आहे. पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेला धबधबा पुलासाठी मात्र धोकादायक झाला आहे.

दोडामार्ग - मांगेली धबधब्याजवळील पुलाच्या पायाचा भाग सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे निखळला आहे. तत्काळ दुरुस्ती न केल्यास पूल कोसळण्याची भीती आहे. पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेला धबधबा पुलासाठी मात्र धोकादायक झाला आहे.

मांगेली तळेवाडी आणि फणसवाडी दरम्यान, तो धबधबा आहे. धबधब्याचे पाणी सुमारे शंभर सव्वाशे मीटरवरून कोसळते. कड्यावरून कोसळणारे पाणी वेगाने तसेच खाली येते. खालच्या भागात पूल आहे. धबधब्याचे पाणी पुलाखालून दरीत जाते. कड्यापासून दरीपर्यंतचा भाग तीव्र उताराचा आहे. साहजीकच पाण्याचा प्रवाह सुसाटत खाली येतो. येताना दगड, माती सोबत घेऊन येतो. पाऊस मोठा असला की पाण्याची पातळी आणि वेग दोन्ही वाढते. तेच पाणी पुलाखालून जाताना पुलाच्या खांबाला खेटून खासी सरकते.

शनिवारी व रविवारी मोठा पाऊस पडला. त्या पावसाने धबधब्याखालील पुलाच्या एका खांबाचा पायाचा सिमेंटचा भाग वेगवान पाण्यामुळे खांबापासून विलग झाला आहे. सतत पाण्याचा मारा होत राहिल्यास पुलाचा खांब कोसळण्याची भीती आहे. तळेवाडी, फणसवाडी जोडणारा मार्ग पूल कोसळल्यास बंद पडण्याची भीतीही आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या पुलाची पाहणी करावी आणि संभाव्य धोका आणि दुर्घटना टाळावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थ पांडुरंग गवस यांनी केली आहे.
 

Web Title: sindhudurg news mangali waterfall bridge in danger