सिंधुदुर्ग : बेवारस अवस्थेत सापडले पाच दिवसांचे अर्भक

अनिल चव्हाण
मंगळवार, 30 मे 2017

सावंतवाडी तालुक्‍यातील आंबोलीपासून 3-4 किलोमीटर अंतरावर पाच दिवसांचे अर्भक रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळून आले आहे. जिवंत अवस्थेत असलेले हे अर्भक मुलीचे असून तिला जवळच्या आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्‍यातील आंबोलीपासून 3-4 किलोमीटर अंतरावर पाच दिवसांचे अर्भक रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळून आले आहे. जिवंत अवस्थेत असलेले हे अर्भक मुलीचे असून तिला जवळच्या आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले आहे.

आंबोलीपासून 3-4 किलोमीटर अंतरावर कोल्हापूर-बेळगाव रस्त्यावर आजरा फाट्याजवळ हे अर्भक आढळून आले. दुचाकीने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अर्भकाचा आवाज आला. त्यांनी याबाबत ैआंबोली पोलिसांना कळविले. सध्या तिला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. मुलगी सुखरून असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Sindhudurg News Marathi news konkan news kolhapur news breaking news Infant found